8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांच्या पगारात १५,४०० रुपयांची वाढ, थकबाकी किती मिळेल?

Central Government Employees : आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला १५,४०० रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला १५,४०० रुपयांची वाढ होऊ शकते. तर प्रत्येक लाभार्थ्यांला सरासरी ३.४० लाख रुपयांपर्यंत एरियर मिळण्याचा अंदाज आहे. पण हे आकडे जेपी मॉर्गन या जागतिक ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केलेल्या अंदाजावर आधारित आहेत.

१.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा?

जेपी मॉर्गनने आपल्या इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी रिपोर्ट २०२७ मध्ये आठव्या वेतन आयोगाबद्दल हे अंदाज मांडले आहेत. त्यानुसार देशातल्या सुमारे १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होऊ शकतो. वेतन, भत्ते आणि पेन्शनमुळे सरकारवर आर्थिक वर्ष २०२८ आणि २०२९ मध्ये मिळून ७.२ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

१.८३ फिटमेंट फॅक्टरनुसार किती वाढणार पगार?

जेपी मॉर्गनने १.८३ फिटमेंट फॅक्टर गृहीत धरून पगारवाढीचा अंदाज व्यक्त केला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. हा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्याने ते वाढून ३३ हजार रुपये होऊ शकते. मात्र, मूळ वेतनात सध्या मिळणारा ६० टक्के महागाई भत्ता समाविष्ट केल्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढ १४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

कर्मचारी संघटनांची ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी

दुसरीकडे, केंद्रीय कर्मचारी संघटनांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याने किमान मूळ वेतन १८ हजारांवरून जवळपास ६९ हजार रुपये होऊ शकते. तसेच वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या ३ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याचीही मागणी करण्यात आली.

२२ महिन्यांचा एरियर मिळण्याची शक्यता?

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात. पण वाढीव पगार नोव्हेंबर २०२७ पासून मिळण्याची शक्यता गृहीत धरल्याने जानेवारी २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या २२ महिन्यांचा एरियर तयार होऊ शकतो. एकूण एरियर सुमारे ४ लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम आर्थिक वर्ष २०२८ मध्ये, तर उर्वरित ६० टक्के रक्कम आर्थिक वर्ष २०२९ मध्ये दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pancreatic cancer: सतत अपचन, पोटदुखीचा त्रास होतोय? स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

हिवाळ्यात थंड की साधे कोणते पाणी आरोग्यासाठी फायदेशीर?

Election Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयकुमार गोरेंना धक्का, मोहिते पाटलांच्या पॅनलचा पहिला उमेदवार विजय

Maharashtra News Live Update: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवार घेतील तो निर्णय मान्य; जिल्हाध्यक्षांचा सकारात्मक कल

Political News: मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, सर्व खासदारांना तातडीने व्हिप जारी

SCROLL FOR NEXT