8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission: ₹२१,७०० बेसिक असणाऱ्यांचा पगार होणार ₹६९ हजार? ८व्या वेतन आयोगाचा मोठा अंदाज

8th CPC Salary Hike: आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढू शकतो? लेव्हल ३ ते ६ साठी २.५७ फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य पगाराचं गणित समजून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहतायेत. नवीन वेतनरचना लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार, हा कर्मचाऱ्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. सध्या २.१०, २.२८ आणि २.५७ अशा फिटमेंट फॅक्टरची चर्चा सुरू आहे. यापैकी कोणताही आकडा अंतिम झालेला नाही. पण या आकड्यांच्या आधारे लेव्हल ३ ते ६ मधल्या कर्मचाऱ्यांचा संभाव्य पगार किती होऊ शकतो, हे समजून घेता येईल.

लेव्हल ३ ते ६ ची सध्याची बेसिक सॅलरी किती?

लेव्हल ३ मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार सध्याची बेसिक सॅलरी २१,७०० रुपये आहे. त्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, कॉन्टेबल, पोस्टमन या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. तर लेव्हल ४ च्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २५,५०० रुपये आहे. यामध्ये अपर डिव्हिजन क्लर्क (UDC), वरिष्ठ लिपिक या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.

लेव्हल ५ च्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी २९,२०० रुपये आहे. यामध्ये असिस्टंट, सीनियर क्लर्क, काही तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO), सब-इन्स्पेक्टर, ज्युनिअर इंजिनिअर यांचा समावेश होतो.

२.५७ फिटमेंट फॅक्टरनुसार किती पगार होणार?

२.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर नवीन बेसिकवर २४ टक्के HRA गृहीत धरला, तर अंदाजे ग्रॉस सॅलरी पुढील प्रमाणे होऊ शकते.

लेव्हल ३ - ६९,१५५

लेव्हल ४ - ८१,२६३

लेव्हल ५ - ९३,०५५

लेव्हल ६ - १,१२,८१३

या कॅलक्युलेशनमध्ये DA शून्य आणि HRA २४ टक्के गृहीत धरलेला आहे. तसेच इतर भत्ते सुद्दा यामध्ये गृहीत धरलेले नाहीत.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पगाराच्या आधारे नवीन बेसिक पगार मोजण्यासाठी वापरला जाणारा गुणक. उदा. लेव्हल ३ ची सध्याची बेसिक सॅलरी २१,७०० असेल. तर तिला २.५७ ने गुणल्यावर नवीन बेसिक ५५७६९ होते. त्यावर २४ टक्के HRA जोडल्यावर अंदाजे ६९,१५५ रुपये होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या पुस्तकातून हटवला; एनसीईआरटीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

Winter Home Hacks : थंडीत हीटरवर पैसे खर्च कशाला? खिडक्या-दरवाज्यांतून येणारी हवा रोखण्यासाठी ५ स्वस्तात मस्त ट्रिक्स

Pressure cooker rice: मऊ, ओलसर आणि मोकळ्या भात होतच नाहीये? लक्षात ठेवा कुकरमधील पाणी आणि शिट्ट्यांचं हे परफेक्ट गणित!

Til Gud Ladoo Recipe: थंडी वाढायला सुरुवात झाली? रोज खा एक टेस्टी-हेल्दी तीळ आणि गूळाचा लाडू, शरिराला मिळेल एनर्जी

Maharashtra Drought : 'गावात नळ आहेत, पण पाणीच नाही...' दुष्काळामुळे सांगवीकरांची वणवण, पाहा ग्राऊंड रिपोर्ट

SCROLL FOR NEXT