8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! २०२६ मध्ये पगारवाढ नाहीच; कधी येणार एरियर?

8th Pay Commission Salary Hike After 2026: आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. परंतु आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ येण्यास अजून उशिर होऊ शकतो. २०२८ मध्ये कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळू शकते.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ लांबणीवर

१५ महिन्यांचा एरियर मिळण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.मात्र, या वर्षात म्हणजे २०२६ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२७ मध्ये पगारवाढ येऊ शकते.

आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात पगारवाढीसाठी शिफारसी लागू करणे गरजेचे आहे. या शिफारसी लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला १८ महिन्यांचा वेळ दिला आहे. या १८ महिन्यात शिफारसी सादर करायच्या आहेत. यानंतर सरकार यावर निर्णय घेईल. त्यानंतर पगारवाढ केली जाईल.

ICRA च्या म्हणण्यांनुसार, आठवा वेतन आयोग लागू होण्यास हा उशिर आर्थिक परिणाम करणार आहे. आर्थिक वर्ष २०२८ मध्ये आर्थिक परिस्थितीत बदल होणार आहे. जेव्हापासून पगारवाढ, पेन्शन किंवा थकबाकी येण्यास सुरुवात होईल तेव्हा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल.

आठवा वेतन आयोग १ जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १५ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठीचा एरियर दिला जाऊ शकतो. यामुळे आर्थिक वर्ष २०२८ मध्ये पगार ४० ते ५० टक्के वाढू शकतो.

मागील वेतन आयोगानुसार मर्यादीत थकबाकी असूनही खर्चात २ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सहाव्या वेतन आयोगात जवळपास दोन वर्षांसाठीचा एरियर द्यावा लागला होता. यामुळे आर्थिक ताण वाढला होता.

भविष्यात कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या एरियरमुळे आर्थिक ताण वाढणार आहे. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये भांडवली खर्च १४ टक्क्यांनी वाढून १३.१लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Homemade Cake Recipe : गव्हाच्या पीठापासून बनवा बेकरी स्टाइल केक, फॉलो करा 'या' स्टेप्स

Farmer : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ई-पीक पेरा नोंदणीत मिळाला दिलासा

SCROLL FOR NEXT