8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आनंदाची बातमी! आजपासून आठवा वेतन आयोग लागू; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Implemented From Today: आठवा वेतन आयोग आजपासून लागू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. तुमचा पगार कितीने वाढणार हे जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठवा वेतन आयोग आजपासून होणार लागू

५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग आजपासून लागू झाला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. यामुळे कर्मचारी, पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन २०२६ पासून लागू झाला आहे. दरम्यान, आता नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ येण्यास उशिर होणार आहे. काही दिवसांनी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळेल. यासाठी शिफारसी सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी १८ महिन्यांचा वेळ दिला आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. मिडिया रिपोर्टनुसार, जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार १८००० रुपये असेल तर तो वाढून ५१,४८० होऊ शकतो. आठवा वेतन आयोगाअंतर्गत ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सरकार दर १० वर्षांनी वेतन आयोग लागू होतो. याआधी २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू झाला होता.

८वा वेतन आयोगात कोणाचा पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Level 1-18 Employees Salary Hike)

नवीन वेतन आयोगात बेसिक सॅलरीत जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा पगार १८००० रुपयांवरुन ३८,७०० रुपये होईल.

लेव्हल २ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार २९,२०० रुपयांवरुन ६२,७८० रुपये होईल.

लेव्हल १० मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार ५६,१०० रुपयांवरुन १,२०,६१५ रुपये होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १५ मध्ये कर्मचाऱ्यांचा पगार १,८१,२०० वरुन ३,९१,७३० रुपये होण्याची शक्यता आहे.

लेव्हल १८ पदांसाठी कर्मचाऱ्यांचा पगार २,५०,००० रुपयांवरुन ५,३७,५०० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT