8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? पगारवाढीसाठी २ वर्षे वाट पाहावी लागणार

8th Pay Commission News: आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे, असा प्रश्न सरकारी कर्मचारी विचारत आहेत.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. मात्र, आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशिर होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी समितीची नेमणूक करावी लागते. त्यानंतरच आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढणार याचा निर्णय घेतला जातो. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही समिती स्थापन करण्यात आलेली नाही.

आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी अध्यक्ष आणि सदस्यांची समिती स्थापन केली जाते. ही समिती सर्व गोष्टींचा विचार करुन फिटमेंट फॅक्टरमध्ये किती वाढ करायची याचा प्रस्तान सरकारला देते. त्यानंतर यावर निर्णय होतो.मात्र, अद्याप याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही.

आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू व्हायला हवा. याबाबत घोषणा १६ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आली आहे. मात्र, पुढे काहीही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे कदाचित आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून उशिर होऊ शकतो. मिडिया रिपोर्टनुसार,सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यास लागलेला कालावधी पाहता हा वेतन आयोग लागू होण्यासाठी २ ते २.५ वर्ष लागू शकते.

आठवा वेतन आयोगासाठी समिती स्थापन केल्यानंतर काही महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. मिडिया रिपोर्टनुसार,जर २०२५ अखेर किंवा २०२६ च्या सुरुवातीला समिती स्थापन केली तर २०२७ किंवा २०२८ मध्ये आठवा वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT