8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 3% ऐवजी आता 6% इन्क्रिमेंटची मागणी

Salary Hike : आठव्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांनी ३ ऐवजी ६ टक्के वार्षिक इन्क्रिमेंट, OPS पुनर्स्थापना, ५० टक्के DA मर्जरमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी संघटनांनी पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सध्या मिळणारी ३ टक्के वार्षिक पगारवाढ थेट ६ टक्के करण्याची मागणी आहे.तसेच जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करावी आणि महागाई भत्त्याचा (DA) ५० टक्के हिस्सा मूळ पगारात जोडावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबत रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या सुविधांमध्येही बदल होऊ शकतो.

१८ नोव्हेंबरला वेतन आयोगासमोर मागण्या

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आपलं मागणीपत्र सादर केलं. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, भत्ता आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

३ टक्क्यांऐवजी ६ टक्के इन्क्रिमेंटची मागणी

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर दरवर्षी ३ टक्के इन्क्रिमेंट मिळते. पण ही वाढ ६ टक्के करावी अशी मागणी संघटनेने केली. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्च लक्षात घेऊन पगारवाढीचं प्रमाण वाढवणं गरजेचं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

DA चा ५० टक्के हिस्सा मूळ पगारात जोडण्याची मागणी

महागाई भत्त्याचा (DA) ५० टक्के हिस्सा मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ व्हायसा मदत होऊ शकते.

जुनी पेन्शन योजना परत लागू करा

NPS आणि UPS योजना बंद करून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) परत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच किमान ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस आणि DA देण्याचाही प्रस्ताव आहे.

विमा संरक्षणात मोठी वाढ करण्याची मागणी

CGEGIS विमा संरक्षण ३० हजार रुपयांवरून १५ लाख रुपये करण्याची मागणी संघटनेने केली आहे. DLI विमा लाभ १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आयोगाने दिला आहे. त्यासोबत कॅज्युअल सुट्ट्या ८ वरून १२ दिवस करण्याची मागणी, चाइल्ड केअर लीव्ह दोन वर्षांपर्यंत वाढवण्याची मागणी, महिलांसाठी दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीची रजा देण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs New Zealand: वेलिंग्टन टेस्टमध्ये भारताच्या विजयाचं स्वप्न भंगलं! मिचेल-फिलिप्सची संयमी फलंदाजी, सामना अनिर्णित

Gulab Jamun Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, लुसलुशीत आणि पाकात मुरलेले गुलाबजाम! वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: अतिक्रमण कारवाईच्या विरोधात ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी लोणावळ्यात दिली बंदची हाक

Salt- Sleep : जेवणात जास्त मीठ खाताय? रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Gold Rate Today : सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक! एक तोळ्यामागे १,४८० रुपयांची वाढ; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT