8th Pay Commission  saam tv
बिझनेस

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोग 2028 पर्यंत लांबल्यास काय होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

Deutsche Bank Report : आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला २०२८ पर्यंत उशीर झाल्यावर सरकारवर ३ लाख कोटींचा जास्तीचा बोजा पडू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करायला २०२८ पर्यंत उशील झाला तर केंद्र सरकारच्या तिजोरीवर तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा जास्तीचा आर्थिक बोजा पडू शकतो, असा अंदाज ड्यूश बँक रिसर्चच्या अहवालात व्यक्त करण्यात आला. त्यामुळे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला होणारा उशीर सरकारसाठी भविष्यात मोठी आर्थिक डोकंदुखी ठरू शकतो.

आठव्या वेतन आयोगाच्या उशीरामुळे ३ लाख कोटींचा फटका?

ड्यूश बँक रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास उशीर झाल्यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन व पेन्शनमधील फरकाची थकबाकी (Arrears) वाढत जाईल. ही थकबाकी एकत्रितपणे द्यावी लागल्यास केंद्र सरकारवर किमान ३ लाख कोटी रुपयांचा जास्तीचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या अंमलबजावणीला उशीर करून तात्पुरती आर्थिक बचत करण्याचा सरकारचा प्रयत्न भविष्यात महागात पडू शकतो.

सरकारचा राजकोषीय तुटीचा आकडा किती?

ड्यूश बँकेच्या 'Great Expectations, But Risky Business' या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये केंद्र सरकारची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) GDP च्या ४.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. सरकारचा एकूण खर्च आणि उत्पन्न यातील तफावत भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागू शकते.

सरकारवर इतर खर्चांचाही दबाव

आठव्या वेतन आयोगाच्या थकबाकीव्यतिरिक्त सरकारसमोर इतर आर्थिक आव्हानं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आयात खर्च वाढू शकतो. तसेच अन्नधान्य आणि खतांवरील अनुदानाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. RBI कडून सरकारला मिळणाऱ्या लाभांशात घट झाल्यास सरकारी उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक अंदाज

या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा आल्यास त्याचा फायदा बाजारपेठेला आणि देशांतर्गत मागणीला होऊ शकतो.

ड्यूश बँकेच्या अंदाजानुसार भारताचा आर्थिक विकासदर पुढीलप्रमाणे राहू शकतो.

FY27: 7.3 टक्के GDP वाढ

FY28: 7.2 टक्के GDP वाढ

FY29: 7.3 टक्के GDP वाढ

कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय?

आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला उशीर झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आणि थकबाकीसाठी जास्त वाट पाहावी लागू शकते. पण, प्रत्यक्ष थकबाकी किती असेल आणि ती कधी दिली जाईल, याबाबत सरकारची अधिकृत घोषणा महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: भारताचा डाव 246 रन्सवर आटोपला, जुरेलने एकाकी झुंज; न्यूझीलंडकडे अजून 243 रन्सची आघाडी

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

Laxmi Yojana : महिलांसाठी महत्त्वाची बातमी! लक्षमी योजनेचे दरमहा २५०० रुपये खात्यात जमा होणार; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Winter Health : हिवाळ्यात गूळ खाताय? मग सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Delimitation Bill: मोठी बातमी! डिलिमिटेशन बिलावरून राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसकडून शरद पवार अन् एम.के स्टॅलिन यांची मनधरणी सुरू

SCROLL FOR NEXT