8th Pay Commission saam tv
बिझनेस

8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाला एक वर्ष पूर्ण! आता पगारवाढीसाठी किती महिने थांबावे लागणार? अपडेट आली समोर

Government Employees Salary : आठव्या वेतन आयोगाला ३ नोव्हेंबर २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण झालं. आयोगाचा अहवाल मे २०२७ पर्यंत अपेक्षित आहे.

Sakshi Sunil Jadhav

8th Pay Commission Latest Update: आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला ३ नोव्हेंबर २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षभरात आयोगाने अनेक कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्यात. या बैठकांमध्ये पगारवाढ, भत्ते आणि पेन्शनसंबंधी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता आठव्या आयोगाचा अहवाल कधी येणार आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार कधी जमा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार मे २०२७ पर्यंत आयोगाच्या शिफारशी सरकारकडे सादर होण्याची अपेक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकार त्याची तपासणी करणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, इतर भत्ता आणि पेन्शनमध्ये किती बदल करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.

मात्र, अहवाल सादर झाला म्हणजे लगेच पगारवाढ मिळेल असं नाही. सरकारकडून सर्व शिफारशींचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेऊन नवीन वेतनरचनेबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. या संपूर्ण प्रोसेसला आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे २०२७ मध्ये अहवाल आला, तरी प्रत्यक्ष वेतनवाढ लागू होण्यासाठी २०२९ किंवा २०३० पर्यंत वेळ लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण याची अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा देशातल्या एक कोटींपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होण्याची शक्यता आहे. यामध्ये ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. रेल्वे आणि संरक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धरणासह तलावातील गाळपेर क्षेत्र यापुढे फक्त चारा लागवडीसाठी

रोहित पाटलांना धक्का, जयंत पाटलांचे गणित बिघडले! जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री अन्...; विजयी उमेदवारांची यादी

Ramayana: पाकिस्तानमध्येही 'रामायण'ची क्रेझ! कराचीतील मंदिरात लावले रणबीर कपूरच्या चित्रपटाचे पोस्टर

जिल्हा परिषद निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार, पाटील फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

Political News : मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादीला अर्थखातं का दिलं नाही? शिंदेसेनेच्या नेत्याने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT