EPFO 3.O: . नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF चे पैसे काढण्याची पद्धत बदलणार, EPFO चा नवा प्लॅन

UPI PF Withdrawal : EPFO 3.0 अंतर्गत कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI द्वारे PF पैसे काढण्याची सुविधा मिळू शकते.
EPFO 3.O
EPFO 3.O saam tv
Published On: 

EPFO 3.0: पीएफ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत पीएफ मधले पैसे काढण्यासीठी ऑनलाइन क्लेम करावा लागत होता. त्यानंतर क्लेम मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागत होती. पण आता ही प्रोसेस जास्त सोपी आणि वेगवान करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) करत आहे. EPFO 3.0 अंतर्गत कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI च्या माध्यमातून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

ATM मधून थेट काढता येणार PF चे पैसे

EPFO च्या नव्या डिजिटल व्यवस्थेमध्ये PF खाते बँकिंग नेटवर्क आणि ATM प्रणालीशी जोडण्याची योजना आहे. यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत तांत्रिक एकत्रीकरण करण्याची तयारी असल्याचे वृत्त आहे. या सुविधेमुळे पात्र खातेदारांना ATM कार्डच्या मदतीने थेट पैसे काढता येऊ शकतात. तसेच UPI किंवा EPFO ॲपच्या माध्यमातूनही पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या प्रक्रियेत खातेदाराची पात्रता आणि पैसे काढण्याची मर्यादा डिजिटल पद्धतीने तपासली जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळी क्लेम प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज कमी होऊ शकते.

EPFO 3.O
SIP Investment : १० हजारांच्या गुंतवणुकीतून १ कोटींचा फंड; पाहा संपूर्ण गणित

UPI द्वारे किती पैसे काढता येणार?

सध्याच्या नियमांनुसार, काही पात्र कारणांसाठी कर्मचारी आपल्या EPF खात्यातील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात. यामध्ये मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम यांसारख्या गरजांचा समावेश आहे. या नियमानुसार खात्यातील किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागते. उर्वरित रकमेवर नियमानुसार व्याज मिळत राहते.

मात्र, UPI आणि ATM द्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष किती रक्कम काढता येईल, याची अंतिम मर्यादा आणि अटी EPFO कडून स्पष्ट केल्या जाणे आवश्यक आहे.

EPFO 3.O
Blood Pressure : वयाच्या साठीनंतर रक्तदाब किती असायला हवा? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य

PF काढण्यासाठी क्लेमची प्रतीक्षा संपणार?

सध्या PF काढण्यासाठी UAN पोर्टलवरून ऑनलाइन क्लेम दाखल करावा लागतो. त्यानंतर पडताळणी आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पैसे बँक खात्यात जमा होतात. मात्र, EPFO 3.0 मुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. पात्र कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी काही मिनिटांत पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

डिसेंबरमध्ये सुविधा सुरू होणार?

मिळालेल्या वृत्तानुसार, EPFO ची ATM आणि UPI द्वारे PF पैसे काढण्याची सुविधा डिसेंबर 2026 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या सुविधेची तांत्रिक तयारी आणि चाचणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, EPFO कडून अंतिम लॉन्च तारीख आणि अधिकृत नियम जाहीर होणे बाकी आहे.

त्यामुळे ही सुविधा सुरू झाल्यानंतर देशातील कोट्यवधी नोकरदार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी PF मधील पैसे मिळवणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.