8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत समिती स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा

सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप फायदा होणार आहे. दरम्यान, लवकरच कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाबाबत खुशखबर मिळू शकते. सरकारने याबाबत अपडेट दिली आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षी म्हणजे २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो. दरम्यान, २०२७ मध्ये वेतन आयोग लागू होईल अशी शक्यता होती. मात्र, आता तुम्हाला २०२७ ची वाट पाहावी लागणार नाही. एका शिष्टमंडळाने सरकारी कर्मचारी राष्ट्रीय महासंघ येथे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. यावेळी ते आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी बोलत असल्याते सांगितले आहे. सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची घोषणा करु शकते, असं सांगण्यात येत आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार कितीने वाढणार? (How much Salary Increase Under 8th Pay Commission)

आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा १८ हजारांहून २६ हजार केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दर दहा वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जातो. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनस भत्ते आणि निवृत्तीवेतनाचा आढावा घेतला जातो. देशात ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख सेवानिवृत्त पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

महागाई भत्त्याबाबतची मिळणार आनंदाची माहिती

आठव्या वेतन आयोगासोबतच महागाई भत्ता वाढण्याचीही घोषणा होऊ शकते. वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढतो.जून ते डिसेंबर या काळातील महागाई भत्त्याची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

SCROLL FOR NEXT