Central Government Employees google
बिझनेस

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Central Government Employees : केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगामुळे पगार, DA, DR, HRA, पेन्शन आणि विविध भत्त्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारशींचा लाभ १ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्याला वेतन आयोगाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) ला मंजुरी दिल्यानंतर आयोग कोणत्या मुद्द्यांवर काम करणार आणि पगार, महागाई भत्ता (DA), पेन्शन तसेच विविध भत्त्यांमध्ये कोणते बदल होऊ शकतात, याचं चित्र स्पष्ट झालं आहे. या वेतन आयोगाचा लाभ देशातल्या १ कोटींपेक्षा जास्त लोकांना होण्याची शक्यता आहे. यामध्ये ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

आठव्या वेतन आयोग हा तात्पुरता आयोग असेल. आयोगामध्ये अध्यक्ष, अर्धवेळ सदस्य आणि सदस्य-सचिव यांचा समावेश असेल. आयोगाला अंतिम शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. गरज असेल तर आयोग अंतिम अहवालही सादर करू शकतो.

आयोग सर्वातआधी पगाराची रचना आणि पे- मैट्रिक्स याचा आढावा घेईल. बदलत्या काळानुसार सरकारी सेवेत मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी वेतन संरचना जास्त सोपी करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच महागाई भत्ता (DA), महागाई दिलासा (DR), घरभाडं भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांचाही पुनर्विचार केला जाणार आहे.

याशिवाय वार्षिक वेतनवाढ, पद वाढीची पद्धत, विविध आर्थिक व गैर-आर्थिक सुविधा तसेच सध्या लागू असलेल्या अनेक भक्त्यांचे सुलभीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. कामगिरीच्या आधारावर परफॉर्मन्स- लिंक्ड इन्सेंटिव्ह आणि बोनस प्रणाली जास्त प्रभावी करण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: या 6 व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो?

Maharashtra News Live Update: भिमाशंकरच्या दुरवस्थेवर सुप्रिया सुळेंची टीका; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT