8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

8th Pay Commission Salary Hike Update: आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ७२,००० करण्याची मागणी केली जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

कर्मचाऱ्यांनी संघटनांनी केली महत्त्वाची मागणी

बेसिक सॅलरी १८००० वरुन ७२,००० करण्याची मागणी

आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. आता आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यानंतर आता कर्मचारी संघटनांनीदेखील आपल्या मागण्या मांडल्या आहेत. सरकारच्या निर्णयानंतर कर्मचारी संघटनांनी आयोगाला पत्र दिले आहे. यामध्ये बेसिक सॅलरीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

आठव्या वेतन आयोगाच्या समितीने केंद्र सरकारला सूचना आणि प्रस्ताव ठेवले आहेत.भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) आपले मागणीपत्र सादर केले आहे. या मागणीपत्रात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कर्मचारी संघटनेच्या मते,सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ७२,००० रुपयांपर्यंत वाढवले पाहिजे. सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मूळ वेतन १८,००० रुपये आहे, त्याच्या चौपट पगार वाढवण्याची मागणी केली जात आहे, याबाबत एबीपी लाइव्हने वृत्त दिले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावात आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा विचारात घेतल्या जातात. त्यानंतर एक रक्कम निश्चित केल्याचा प्रयत्न केला आहे. BPMS च्या म्हणण्यांनुसार, जर हा बदल स्विकारला गेला तर नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

युनियनच्या मागण्या काय आहेत? (8th Pay Commission Employees Demands)

कर्मचारी संघटनांच्या मते, सध्याचा फिटमेंट फक्टर २.५७ वरुन ४.० पर्यंत वाढवला जावा. यावरच बेसिक सॅलरी वाढवणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर ४.० पर्यंट वाढला तर कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे. युनियनच्या म्हणण्यांनुसार, महागाई भत्ता योग्य पद्धतीने निश्चित केला जावा. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: मराठा सामाजिक मागास असा अहवाल कुणी दिला?, लक्ष्मण हाके यांचा सरकारला सवाल

Pune Accident: पुणे- सातारा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Tushar Deshpande: संकटात सापडलेल्या टीमसाठी तुषार ठरला तारणहार, अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला विजय

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नाशिकच्या आंदोलकांकडून भर पावसात उपोषण सुरू

SCROLL FOR NEXT