8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जर फिटमेंट फॅक्टर ३.२५ झाला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० रुपये होईल

आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. आठव्या वेतन आयोगात पगारदेखील कितीने वाढणार असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, पगारवाढ लागू होण्यास अजून काही वेळ आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिफारसी लागू होण्याची प्रतिक्षा आहे. शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. या शिफारसी लागू होण्यासाठी १८ ते २० महिन्यांचा वेळ लागणार आहे.

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर किती असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर २.८६ ते ३.२५ पर्यंत ठेवण्याची मागणी केली आहे. जर फिटमेंट फॅक्ट ३.२५ निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ लागू होता तेव्हा पगार ७,००० रुपयांवरुन १८,००० रुपये झाला होता.

आठव्या वेतन आयोगासाठी सरकारने वेबसाइट सुरु केली आहे. https://8cpc.gov.in/ या वेबसाइटवर तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे. याचसोबत कर्मचारी काही सूचनादेखील देऊ शकतात. यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. दरम्यान, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगारवाढ मिळण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजून बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे. फिटमेंट फॅक्टर किती लागू होणार त्यावर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT