फिटमेंट फॅक्टर 2.0 ते 2.57 दरम्यान राहिल्यास वेतनात मोठी वाढ होऊ शकते
मूळ वेतन वाढले तरी एकूण पगारवाढ भत्त्यांवरही (Allowance) अवलंबून असते
HRA, DA आणि इतर भत्त्यांमध्ये बदल झाल्यास कर्मचाऱ्यांचे उत्पन्न अधिक वाढू शकते
पगारवाढीचा अंतिम आकडा आयोगाच्या शिफारसी आणि सरकारी निर्णयावर अवलंबून असेल
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ‘फिटमेंट फॅक्टर’ हा शब्द चर्चेत असून, त्यावरच पगारवाढीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन दुप्पट होणे. याच्या आधारावरच नवीन मूळ वेतन ठरवले जाते. उदाहरणार्थ, फिटमेंट फॅक्टर 2.0 असल्यास कर्मचाऱ्याचा मूळ पगार दुप्पट होऊ शकतो. मात्र, मूळ वेतन दुप्पट झाले म्हणून एकूण हातात मिळणारा पगारही तितक्याच प्रमाणात वाढेल, असे नाही.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.0 ते 2.57 दरम्यान निश्चित झाल्यास लेवल 1 ते 18 मधील कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात सुमारे 31 ते 58 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामध्ये मूळ वेतनासोबत विविध भत्त्यांचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ, सध्या एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये असल्यास आणि फिटमेंट फॅक्टर २.० लागू झाला, तर त्याचे नवीन मूळ वेतन ३६,००० रुपये होऊ शकते. मात्र, एकूण वेतन सुमारे ४४,६४० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ एकूण पगारात जवळपास ३१ टक्के वाढ होईल.
यापूर्वीच्या वेतन आयोगांचा विचार केला तर सहाव्या वेतन आयोगात १.८६ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यावेळी एकूण वेतनात सुमारे ५४ टक्के वाढ झाली होती. तर सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर असला तरी एकूण वेतनवाढ १४.२९ टक्क्यांच्या आसपास होती. त्यामुळे केवळ फिटमेंट फॅक्टरचा आकडा पाहून पगारवाढीचा अंदाज बांधणे योग्य नाही. याशिवाय, घरभाडे भत्ता (HRA), महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. शहरांच्या श्रेणीनुसार HRA मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या एकूण उत्पन्नात आणखी भर पडू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.