Free Netflix Subscription Saam Tv
बिझनेस

84 दिवसांसाठी मोफत पाहता येणार Netflix, काय आहे ऑफर जाणून घ्या

Free Netflix Subscription: जर तुम्हाला नेटफ्लिक्स कंटेंट पाहण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या अशा प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

साम टिव्ही ब्युरो

Free Netflix Subscription:

जर तुम्हाला नेटफ्लिक्स कंटेंट पाहण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या अशा प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मोफत मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटासोबत अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएसची सुविधाही मिळेल. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

एअरटेल 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये OTT फायदे म्हणून Netflix (बेसिक) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, Apolay 24/7 सर्कल, मोफत HelloTunes आणि मोफत Wynk म्युझिकचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3GB डेटा (4G) आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. मात्र जर तुम्ही एअरटेलचे 5G नेटवर्क असलेल्या भागात रहात असाल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकता.  (Latest Marathi News)

जिओचा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान

Airtel प्रमाणे, Jio चा 1499 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये OTT फायदे म्हणून Netflix (बेसिक) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 3GB डेटा (4G) आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. मात्र तुम्ही जिओचे 5G नेटवर्क असलेल्या भागात राहता असाल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकतात.

जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान

जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात OTT फायदे म्हणून Netflix (Mobile) चे सब्सक्रिप्शन समाविष्ट आहे. याशिवाय यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा (4G) आणि दररोज 100 SMS देखील मिळतात. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. मात्र तुम्ही जिओचे 5G नेटवर्क असलेल्या भागात राहता असाल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT