Aadhaar Data Leak Saam Tv
बिझनेस

Aadhaar Data Leak: धक्कादायक! 81.5 कोटी भारतीयांचा आधार-पासपोर्टचा डेटा डार्क वेबवर लीक, अहवालातून समोर

Aadhar Passport Data Leak : ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधितचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.

कोमल दामुद्रे

Data Leak Report :

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रे. यामार्फत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली जातात. अशातच डार्क वेबवर आधार लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, ८१.५ कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधितचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकन कंपनीने म्हटले की, ९ ऑक्टोबर रोजी 'pwn0001' या व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली. त्यात ८१.५ कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती देण्यात आली आणि ती विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायबर सिक्युरिटीनुसार संबंधित डेटा हा ८० हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर देण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार हा डेटा लीक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)कडून असू शकतो. बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे की ICMR ने अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. या डेटा लीकची सध्या सीबीआय चौकशी करत आहे.

हॅकर ऑन X ने देखील माहिती दिली आहे की भारतातील (India) सर्वात मोठा डेटा (Data) लीक म्हणजे हॅकर्सनी 80 कोटींहून अधिक भारतीयांचा खाजगी डेटा लीक केला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक (Aadhar number) आणि वयाची माहिती आहे. मात्र, या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT