Realme GT 6T 2024 Saam Tv
बिझनेस

50MP Sony IMX882 कॅमेरा, 5500mAh बॅटरी; या दिवशी भारतात लॉन्च होणार Realme GT 6T स्मार्टफोन

Upcoming Smartphones: Realme लवकरच भारतात आपला पॉवरफुल मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Upcoming Smartphones:

Realme लवकरच भारतात आपला पॉवरफुल मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे. कंपनी 22 मे 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता भारतीय ग्राहकांसाठी Realme GT 6T लॉन्च करेल.

कंपनी दोन वर्षांनी भारतात Realme GT सीरीज आणत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Realme चा हा मिड-रेंज स्मार्टफोन गेम चेंजर ठरेल. ग्राहक realme.com, Amazon.in आणि ऑफलाइन स्टोअरला भेट देऊन हा स्मार्टफोन खरेदी करू शकतील.

Realme GT 6T स्मार्टफोन 4 नॅनोमीटर अॅडव्हान्स Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेटसह येईल. हाय परफॉर्मन्स, हाय स्पीड आणि मजबूत बॅटरी लाईफसह हा फोन भारतात येत आहे. यासह याचा CPU परफॉर्मन्स 15 टक्के वाढेल, ज्यामुळे GPU पॉवर 45 टक्क्यांनी वाढेल.

या स्मार्टफोनमध्ये 1.5K 8T LDPO डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी 5500mAh बॅटरीची सुविधा देखील उपलब्ध असेल आणि 120 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील यात ग्राहकांना मिळू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा ग्राहकांना मिळेल. या फोनला सेफ्टीच्या बाबतीत IP65 रेटिंग मिळाली आहे. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 सपोर्टसह लॉन्च केला जाईल.

किती असेल किंमत?

सध्या कंपनीने अधिकृतपणे फोनची किंमत उघड केलेली नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, Realme GT 6T च्या 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये, 8GB/256GB ची किंमत 33,999 रुपये आणि 12GB/512GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates : जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर दाखल

School Education: सरकारी शाळेचा खर्च फक्त ३ हजार, खासगी शाळांनी केला खिसा रिकामा, NSS सर्वेक्षणाचे आकडे वाचून धक्का बसेल

Maruti Escudo: ब्रेझापेक्षा मोठी आणि ग्रँड विटारापेक्षा स्वस्त! मारुतीची नवी SUV 'या' दिवशी होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स

Manoj Jarange Protest 4th Day: आजपासून पाणी पिणार नाहीत, मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

मुंबईकरांची कोंडी; आझाद मैदान, CSMTकडे जाणारे सर्व मार्ग बंद, दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या अनेक मार्गातही बदल

SCROLL FOR NEXT