Pan Card  Saam Tv
बिझनेस

Pan Card: देशातल्या ५० टक्के जनतेकडे पॅनकार्ड, महिला-पुरुषांची संख्या किती? 'इन्कम टॅक्स'चा डेटा आला समोर

Pan Card News: देशातील प्रत्येक नागरिकाकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने पॅन कार्ड काढायला हवे. नुकतील प्राप्तिकर विभागाने पॅनकार्डधारकांची आकडेवारी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील प्रत्येक नागरिकाकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने पॅन कार्ड काढायला हवे. नुकतील प्राप्तिकर विभागाने पॅनकार्डधारकांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जवळपास ५० टक्के लोकसंख्येकडे पॅन कार्ड आहे. यात पॅन कार्ड महिलांपेक्षा पुरुषांकडे जास्त आहे. परंतु मागील काही वर्षात महिला आणि पुरुषांच्या पॅन धारकांच्या संख्येतील अंतर कमी होत आहे.

प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील ४२.१० कोटी पुरुषांकडे पॅनकार्ड आहेत. तर ३१.०५ कोटी महिलांकडे पॅन कार्ड आहे. या डेटामध्ये असे सांगण्यात आले आहे की, १४ कोटी पेक्षा जास्त पॅन क्रमांक निष्क्रिय होऊ शकतात. कारण हे पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले नाही.

३१ मार्च २०२४ पर्यंतच्या डेटावरुन असे समोर आले आहे की, ७४.६७ कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. २०२३ च्या तुलनेत १० टक्के जास्त लोकांनी पॅन कार्डसाठी रजिस्टर केले आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत जवळपास ९७ ते ९८ टक्के पॅनधारक होते. यात पुरुष पॅन धारकांची संख्या जास्त होती.

पॅन कार्ड रजिस्टर वाढीची कारणे

  • पॅन कार्ड हे सर्व व्यव्हारांमध्ये अनिवार्य आहे.

  • १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.

  • टीडीएस (TDS)आणि टीसीएस (TCS) विश्लेषण करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

  • प्राप्तिकर नियमांचे नियम 114(B) 18 प्रकारचे आर्थिक व्यवहारांसाठी PAN करणे अनिवार्य आहे.

महिला गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाल्याचे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्त्री- पुरुषांमधील पॅन कार्ड धारकांची संख्या कमी झाली आहे.

आतापर्यंत ७४.६७ पॅन कार्डपैकी ६०.५ कोटी पेक्षा जास्त पॅन कार्ड आधारशी जोडले गेले आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यामुळे डुप्लिकेट पॅन कार्ड ब्लॉक करण्यास मदत झाली आहे. अजूनही अनेक लोकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT