Income Tax Refund: १० जानेवारीपर्यंतचा प्राप्तिकर परतावा जारी; तुम्हाला मिळाला का? असा चेक करा

Income Tax Refund Process: प्राप्तिकर विभागाने कराचा परतावा जारी केला आहे. आयकर विभागानुसार करदात्यांना एकूण २.४८ लाख कोटी रुपयांचा कर परतावा जारी करण्यात आला आहे.
Income Tax
Income TaxSaam tv
Published On

How to Check Income Tax Refund Process:

प्राप्तिकर विभागाने कराचा परतावा जारी केला आहे. आयकर विभागानुसार करदात्यांना एकूण २.४८ लाख कोटी रुपयांचा कर परतावा जारी करण्यात आला आहे. २०२३-२४ वर्षासाठी १ एप्रिल २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत २.४८ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. (Latest News)

इन्कम टॅक्स रिटर्न अर्ज केल्यानंतर परतावा मिळण्याची अनेकजण वाट पाहत असतात. हा परतावा तुम्हाला आला आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकता. यासाठी आयकर पोर्टलवर एक नवीन सेवा सुरू करण्यात आले आहे. येथे तुम्ही तुमच्या परताव्याची स्थिती तपासू शकतात.

Income Tax
Senior Citizen FD: ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ; FD वर या बँका देताहेत जबरदस्त व्याजदर

परतावा आला आहे की नाही कसे चेक कराल?

नवीन आयकर वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयकर परताव्याची माहिती दिसेल. तुमच्या कराचा परतावा मंजूर झाला आहे की हे तपासण्याची आणखी एक पद्धत आहेत. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला क्विक लिंक्स सेक्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्क्रोल केल्यावर रिफंड स्टेटस दिसेल. त्यावर तुमचा पॅन क्रमांक, वर्ष, मोबाइल नंबर टाकावा. त्यानंतर ओटीपी टाकावा. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर परताव्याची संपूर्ण माहिती मिळेल. ज्या लोकांच्या आयटीआरची तपासणी करायची आहे. त्या लोकांना आयकर परतावा मिळालेला नाही.

Income Tax
Upcoming Car: MPV सेगमेंटमध्ये लवकरच लाँच होणार जबरदस्त कार; पाहा लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com