selling old gold jewellery tips AI Image
बिझनेस

Gold Jewellery : जुने सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करताय? मग घाई करण्यापूर्वी 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Gold Jewellery Selling Tips : जुने सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करताय? मग आधी सोन्याची शुद्धता, वजन, हॉलमार्क, मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सकडून होणारी कपात या 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Alisha Khedekar

सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर अनेकजण जुने दागिने विकण्याचा विचार करत असतील. मात्र, दागिने विकण्याची घाई करू नका. कारण बाजारात सोन्याचा जो दर सुरू असतो, त्याच दराने जुन्या दागिन्यांचे पैसे मिळतीलच असे नाही. दागिन्यांची शुद्धता, वजन आणि त्यामध्ये असलेले इतर धातू यांचा विचार करून ज्वेलर्स पैसे देतात. त्यामुळे जुने सोने विकण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

सोन्याची शुद्धता तपासा

तुमच्याकडे 22 कॅरेटचे दागिने असले तरी त्यांची शुद्धता प्रत्यक्ष तपासणीत वेगळी निघू शकते. जुन्या दागिन्यांची दुरुस्ती किंवा त्यातील इतर धातूंमुळे शुद्धतेत फरक पडू शकतो. त्यामुळे दागिने विकण्याआधी त्यांची शुद्धता तपासून घ्या. दागिन्यांवर BIS हॉलमार्क आणि HUID क्रमांक असल्यास BIS Care ॲपवर त्याची माहिती तपासता येते.

दागिन्यांचे वजन

दागिन्यांचे एकूण वजन आणि त्यातील सोन्याचे वजन वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, तुमच्या 20 ग्रॅमच्या चेनमध्ये 2 ग्रॅम वजनाचे खडे किंवा इतर भाग असतील, तर सोन्याचे वजन फक्त 18 ग्रॅम धरले जाऊ शकते. त्यामुळे पैसे ठरवण्यापूर्वी सोन्याचे नेमके वजन किती आहे, हे विचारा.

मेकिंग चार्जचे पैसे

नवीन दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीसोबत मेकिंग चार्ज आणि कर द्यावा लागतो. मात्र, जुने दागिने विकताना हे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे खरेदीच्या बिलावरील रक्कम आणि विक्रीत मिळणारी रक्कम सारखी असेल, अशी अपेक्षा ठेवू नका. काही ज्वेलर्स दागिने वितळवणे किंवा शुद्धीकरणाच्या नावाखाली पैसे कमी देतात. त्यामुळे किती पैसे आणि कोणत्या कारणासाठी कापले जात आहेत, याची स्पष्ट माहिती घ्या. थोडक्यात सांगायचे तर, जुने सोने विकताना घाई करण्याऐवजी त्याची शुद्धता, वजन आणि बाजारभाव समजून घ्या. दोन-तीन ठिकाणचे दर तपासा आणि सर्व माहिती स्पष्ट झाल्यानंतरच दागिने विकण्याचा निर्णय घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचं सरकार असलेल्या राज्याचं नाव बदलणार; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maheshwari Saree Designs: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा महेश्वरी साडीचे ७ सुंदर आणि रॉयल डिझाइन्स!

Jalna: ३८ हजार रुपये दे नाहीत तर मर, वसुली एजंटकडून बळीराजाचा छळ; संतापजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

पुण्यात पर्वतीवर कार्तिक स्वामी उत्सवास प्रारंभ; दर्शनाची नेमकी वेळ कोणती? मोरपिसे वाहण्यास बंदी का? जाणून घ्या सर्व माहिती

तुमचाही फोन टॅप होतोय? दुर्लक्ष करू नका! या 5 संकेतांमधून लगेच ओळखा

SCROLL FOR NEXT