2024 Apache RTR 160 4V Saam Tv
बिझनेस

2024 Apache RTR 160 4V लॉन्च, पॉवरफुल इंजिन अन् स्मार्ट लूक; जाणून घ्या फुचर्स आणि किंमत

Satish Kengar

2024 Apache RTR 160 4V :

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने आपल्या हायस्पीड बाईक Apache RTR 160 4V चे नवीन अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. जुन्याच्या तुलनेत यात ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

या बाईकला पूर्वीपेक्षा मोठा 240 मिमी रियर डिस्क ब्रेक प्रदान करण्यात आला आहे, जो रायडरला टायरवर पूर्ण नियंत्रण देईल. नवीन बाईकची किंमत 1.34 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन बाईकमध्ये पूर्वीपेक्षा 17.6 hp जास्त पॉवर मिळेल. याचा फ्रंट लुक खूपच आकर्षक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑटो कार इंडियाच्या रिपोर्टनुसार, TVS च्या Apache RTR 160 4V चे शनिवारी गोव्यात Motosoul 2023 मध्ये अनावरण करण्यात आले. सध्या कंपनीने त्याच्या डिलिव्हरीच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या बाईकमध्ये स्पोर्ट, अर्बन आणि रेन असे तीन मोड असतील.  (Latest Marathi News)

यावेळी बाईकला नवीन हलका निळा रंग मिळेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या TVS Apache RTR 160 4V बद्दल बोलायचे झाले तर, ते सिंगल डिस्क आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह येते. या डॅशिंग बाईकचे बेस मॉडेल 1.24 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

सध्या 4 प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यात 159.7cc इंजिन आहे. TVS Apache RTR 160 4V ही कंपनीची स्ट्रीट बाईक आहे, ज्यामध्ये चार रंग उपलब्ध आहेत. सध्याची बाईक 17.3 bhp ची पॉवर आणि 14.73 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 12 लीटरची इंधन टाकी आहे.

यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि अलॉय व्हील्स आहेत. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. यात मोठ्या हेडलाइटसह स्टायलिश डीआरएल आहे. बाईकला आरामदायी सस्पेंशन पॉवर आणि अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हरसह हँडलबार मिळतो. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहे, ज्यामुळे ही बाईक हाय परफॉर्मन्स होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT