Flipkart Sale: 16GB रॅम आणि 50MP कॅमेरा, 'हा' जबरदस्त स्मार्टफोन फक्त 6299 रुपयात खरेदी करण्याची संधी

Infinix HOT 30i: 16GB रॅम आणि 50MP कॅमेरा, हा जबरदस्त स्मार्टफोन फक्त 6299 रुपयात खरेदी करण्याची संधी
Infinix HOT 30i
Infinix HOT 30iSaam Tv
Published On

Flipkart Big Year End Sale:

जर तुम्ही हेवी स्पेसिफिकेशन्ससह स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु तुमचे बजेट कमी असेल, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग इयर एंड सेलमध्ये तुमच्यासाठी बरेच काही आहे. Infinix चा एक जबरदस्त फोन कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे.

आम्ही Infinix HOT 30i बद्दल बोलत आहोत. फोनमध्ये 6.6-इंचाच्या डिस्प्लेसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत RAM (8GB व्हर्च्युअल रॅमसह) आहे. तुम्ही याचे 16GB रॅम मॉडेल 6,299 रुपयांना कोणत्याही एक्सचेंज ऑफरशिवाय खरेदी करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Infinix HOT 30i
Apple चा मोठा प्लान, भारतात दरवर्षी 5 कोटीहून अधिक iPhones बनवणार कंपनी

हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो – डायमंड व्हाइट, मिरर ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि मॅरीगोल्ड आणि रॅम आणि स्टोरेजनुसार, तो 4GB + 64GB आणि 8GB + 128GB या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. येथे आम्ही तुम्हाला Infinix HOT 30i च्या दोन्ही प्रकारांवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सांगत आहोत. (Latest Marathi News)

फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना लिस्टेड करण्यात आला आहे. परंतु 2,500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर कोणताही एक्सचेंज बोनस नाही. पण बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही यावर 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. समजा, तुम्ही संपूर्ण बँक ऑफरचा लाभ घेण्यास यशस्वी झल्यास, फोनची किंमत 5,499 रुपयांपर्यंत खाली येईल.

Infinix HOT 30i
Best Mileage Scooter: 'ही' स्मार्ट स्कूटर देते 62 kmpl चा मायलेज, फक्त 9000 रुपयात घरी घेऊन जाण्याची संधी

यातच फोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 11,999 रुपयांना लिस्टेड आहे. परंतु 3,700 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर 8,299 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलवर कोणताही एक्सचेंज बोनस नाही. पण बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही यावर 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तसेच तुम्ही संपूर्ण बँक ऑफरचा लाभ घेण्यास यशस्वी झाल्यास फोनची किंमत 6,299 रुपयांपर्यंत खाली येईल. ऑफरचा फायदा फोनच्या सर्व कलर व्हेरियंटवर उपलब्ध आहे.

कॅमेरा आणि बॅटरी देखील दमदार

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगसह येते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बॅटरी एका चार्जवर 30 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com