Finance Commission Chairman Arvind Pangadhia Google
बिझनेस

Unemployment : बेरोजगारी ही भारतासाठी समस्या नाही, खरा प्रॉब्लम तर...; नीती आयोगाच्या माजी अध्यक्षांचं अजब विधान

Unemployment : नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी बेरोजगारीवर अजब वक्तव्य केलंय. बेरोजगारी ही खरोखर भारताची समस्या नाही, तर अल्प रोजगारी ही खरी समस्या असल्याचं म्हटलंय.

Bharat Jadhav

Unemployment Not Problem For India:

बेरोजगारी ही भारतासाठी समस्या नाही, पण अल्प रोजगारी ही नक्कीच एक समस्या असल्याचं मत 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि NITI आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी व्यक्त केलं. येत्या १० वर्षात देशातील नोकऱ्यांचा प्रश्न सुटेल, अशी आशाही त्यांनी कामगार सुधारणा संदर्भात बोलताना व्यक्त केली.(Latest News)

“माझ्या मते, बेरोजगारी ही खरोखर भारताची समस्या नाही. आमची समस्या अल्प रोजगारीची आहे, त्यामुळे उत्पादकता कमी आहे. यामुळे परिस्थितीत, जे काम एक व्यक्ती करू शकते ते बहुतेकदा दोन लोक किंवा तीन लोक करतात. "म्हणून मला वाटते की नोकऱ्यांसाठी खरे आव्हान म्हणजे चांगल्या पगाराच्या, उच्च-उत्पादकतेच्या नोकऱ्या निर्माण करणं असल्याचं मत अरविंद पनगढिया यांनी मांडलं.

भारत हा आर्थिक दृष्टीने कामगार-विपुल आणि भांडवलाची कमतरता असलेला देश आहे. बहुतेक ठिकाणी कमी कामगार आहेत. तर दुसरीकडे, शेती, सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आहेत, जेथे भांडवल जेमतेम आहे. असे बरेच कामगार आहेत जे फार कमी भांडवलात काम करत असल्याचं पनगढिया म्हणाले. देशाला अजूनही कामगार आणि व्यापार कायद्यात सुधारणा करणं आवश्यक आहे, "इतर देशांच्या तुलनेत, संरक्षणाची पातळी जास्त असून ती कमी करणे आवश्यक आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

" भारतात सहमती निर्माण करणे हा लोकशाही सुधारणा प्रक्रियेचा एक भाग आहे, त्यामुळे कायदे पारित करणे ही एक संथ प्रक्रिया असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान पनगढिया यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात कामगार कायदे लागू केले होते. त्यानंतर कोणत्याही सरकारने हिंमत दाखवली नाही. मोदी सरकारने कायदे केले. आता कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना नियम तयार करावे लागणार आहेत.

सुधारणांबद्दल बोलताना पनढिया म्हणाले, "कामगार कायद्यांची अंमलबजावणी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि बँकांचे खाजगीकरण या काही महत्त्वाच्या सुधारणा आहेत ज्या करणे आवश्यक आहे." असल्याचं पनगढिया म्हणालेत. एकूणच आपण चांगल्या स्थिस्तीत आहोत. काही समस्या देखील आहेत, परंतु मला वाटते की आम्ही येत्या १० वर्षांत त्या सोडवू. तसेच नोकऱ्यांचा प्रश्नही सुटेल अशी आशा सुद्धा पनगढिया यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT