उद्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हे पहिले बजेट असणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. बजेटचा परिणाम हा शेअर मार्केट, स्टॉक,बँकांवरदेखील होणार आहे. त्यामुळे उद्या शनिवारी बँका आणि शेअर मार्केट खुलं राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
उद्या बँका सुरु असणार का? (Is Bank Open Tommorow Budget 2025)
उद्या १ फेब्रुवारी रोजी बँका सुरु राहणार आहे. बँकेची कामे नियमितपणे सुरु राहणार आहे. रोजच्या वेळेनुसार बँका उघडणार आहे. अशातच उद्या महिन्याचा पहिला शनिवार आहे. त्यामुळे बँका खुल्या राहणार आहेत. सर्व बँकेच्या ब्रँचमध्ये कामे सुरु असणार आहेत.
सध्या बँका पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खुल्या असतात. परंतु अनेक दिवसांपासून ५ दिवस बँका सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, अर्थसंकल्पात हा निर्णय होऊ शकतो. परंतु तोपर्यंत बँका पहिल्या शनिवारी खुल्या असणार आहे.
उद्या शेअर मार्केट बंद असणार का? (Is stock market open tomorrow on saturday Budget Session)
उद्या शनिवारी १ फेब्रुवारी रोजी शेअर मार्केट सुरु असणार आहे. शेअर मार्केटमध्ये उद्या स्पेशल ट्रेडिंग सेशन होणार आहे. उद्या बजेटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम शेअर मार्केट आणि स्टॉक्सवर होणार आहे. त्यामुळे उद्या शेअर मार्केट खुलं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.