Union Budget 2024 Latest News in Marathi  Saam TV
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2024: विकसित भारतासाठी सरकारचा पुढचा प्लान काय? अर्थमंत्र्यांनी सगळं उलगडूनच सांगितलं...

Union Budget 2024 News: विकसित भारतासाठी केंद्र सरकारचा पुढचा प्लान काय? याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सगळं उलगडून सांगितलं.

Satish Daud

Union Budget 2024 Latest News in Marathi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडताना मोदी सरकारने केलेल्या १० वर्षांच्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातून सरकारने काय-काय कामे कामे केलीत, याची माहिती देखील अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत दिली. तसेच विकसित भारतासाठी केंद्र सरकारचा पुढचा प्लान काय? याबाबतही उलगडून सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विकसित भारतासाठी केंद्र सरकारला ४ बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचं सीतारामन म्हणाल्या. आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत, अशी माहिती देखील सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत दिली.

देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करतोय, प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडून देण्यासाठी काम करण्यात आले आहे. अन्ना संबंधीची समस्या दूर केली, अशी माहिती देखील सीतारामन यांनी दिली. (Latest Marathi News)

भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होणार आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करीत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं.

तरुणांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. शेती क्षेत्रातून 3 लाख कोटींचा व्यापार होत आहे. सकल विकासाकडे सरकारचं लक्ष आहे. महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर असून गेल्या १० वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत, असल्याची माहिती देखील सीतारामन यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT