2024 Budget 10 Big Announcement Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Top Highlights: अर्थसंकल्पातील १० महत्वाच्या घोषणा, कोणाला काय मिळालं? वाचा एका क्लिकवर

Budget 2024 Top 10 Big Announcement: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या मोठ्या घोषणा केल्या? जाणून घेऊयात...

Satish Daud

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी सर्वसामान्यांपासून नोकरदार, करदाते तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. याशिवाय अर्थमंत्र्यांनी अनेक विविध क्षेत्रासाठी वाढीव तरतूद देखील जाहीर केली. तसेच रोजगार निर्मितीसाठी अनेक योजना सादर केल्या.

या योजनेमुळे देशाच्या विकासाला आणखीच चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  अर्थसंकल्प मांडताना (Union Budget 2024) सर्वप्रथम अर्थमंत्री सीतारामन यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानले.

गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या ४ समाज घटकांवर केंद्र सरकारचे विशेष लक्ष असेल, असंही सीतारामन यांनी सांगितलं. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी कोणकोणत्या मोठ्या घोषणा (Budget 2024 Announcement) केल्या? जाणून घेऊयात...

अर्थसंकल्पातील १० महत्वाच्या घोषणा कोणत्या?

  • पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना 5,000 रुपये मासिक भत्ता मिळणार

  • पीएम आवास योजना-शहरी 2.0 अंतर्गत, 1 कोटी कुटुंबांना घरे दिली जाणार.

  • शहरी घरांसाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देण्यासाठी सरकार व्याज अनुदान योजना आणणार.

  • पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, प्रथमच EPFO ​​मध्ये नोंदणी करणाऱ्यांना 15,000 रुपयांची मदत मिळणार.

  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तब्बल १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार.

  • शेतकरी, युवक, महिला, गरीब यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या राबवल्या जाणार.

  • महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने 3 लाख कोटी रुपयांहून अधिकची तरतूद केली.

  • भाजीपाला उत्पादन आणि पुरवठा साखळीसाठी अधिक एफपीओ तयार केले जाणार. शेतजमिनी आणि शेतकऱ्यांच्या नोंदी डिजिटल करण्यावर भर दिला जाईल.

  • हवामान अनुकूल बियाणे विकसित करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्र, तज्ञ आणि इतरांना अधिकचा निधी दिला जाणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT