Union Budget 2024 Announced Saam TV
Budget

Budget 2024 For PMAY: घराची चिंता खरंच मिटणार! बजेटमध्ये अफोर्डेबल हाउसिंग स्कीमबाबत मोठी घोषणा; वाचा

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २३ जुलै २०२४

मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण या संसदेत अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. यामध्ये शेतकरी, महिला, युवकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या बजेटमध्ये औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण होणार असून सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे.

एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आजच्या बजेटमध्ये परवडणाऱ्या घरांबाबत (अफोर्डेबल हाऊसिंग स्किम) मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी पीपीपी (पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप) मोडमध्ये भाड्याची घरांची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

अर्थमंत्र्यांनी उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी भाडेतत्त्वावरील घरांची योजना जाहीर केली आहे. शहरातील एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पीएम आवास योजना 2.0 मध्ये लाभ दिला जाणार आहे. तसेच निवडक शहरांमध्ये १०० आठवडी हाट किंवा स्ट्रीट फूड हब बनवले जाणार आहे. 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 मोठ्या शहरांमध्ये संक्रमणाभिमुख विकास योजना असतील.

त्यासोबत मुद्रा लोनची मर्यादा १० लाखांवरुन आता २० लाख रुपये करण्यात आली आहे. मुद्रा लोनची मर्यादा वाढवल्यनं MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणाता प्रोत्साहन मिळेल, असं जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, या बजेटमध्ये शेतीसाठी नव्या योजनांचा अभाव जाणवत असून कोणत्याही मोठ्या घोषणा झाल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT