Union Budget 2024 Key Highlight in Marathi Here Are Some Big Announcements Made by Nirmala Sitharaman in the Interim Budget 2024 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Key Highlights: अर्थमंत्र्यांनी बजेट मांडताच संसदेत टाळ्यांचा कडकडाट; कोणकोणत्या मोठ्या घोषणा झाल्या?

Union Budget 2024 Marathi News: अर्थसंकल्प सादर होताच संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील इतर सदस्यांनी अर्थसंकल्पाला दाद देत अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं स्वागत केलं.

Satish Daud

Union Budget 2024 Important Announcements

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या घोषणांची माहिती दिली. तसेच भारताला विकसित बनवण्यासाठी मोदी सरकाचा पुढचा प्लान काय असेल? याबाबतही उलगडून सांगितलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थसंकल्प सादर होताच संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदेतील इतर सदस्यांनी अर्थसंकल्पाला दाद देत अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांचं स्वागत केलं. निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील हा सहावा अर्थसंकल्प होता.

यावेळी त्यांनी ५७ मिनिटे भाषण केले. सुरुवातीला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गेल्या १० वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने काय विकासकामे केली? याचा पाढाच वाचून दाखवला. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागून होतं. (Latest Marathi News)

सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार? महिला तसेच शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार? तरुणांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार काय निर्णय घेणार? असे अनेक प्रश्न देशभरातील नागरिकांच्या मनात होते. याचे उत्तर आजच्या अर्थसंकल्पातून मिळाले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा केल्या, जाणून घेऊयात...

अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

  • येत्या ५ वर्षात देशभरातील गरजू व्यक्तींसाठी दोन कोटी घरे बांधली जाणार.

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणणार.

  • येत्या काळात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जाणार. यासाठी समिती स्थापन करणार.

  • देशभरातील आशा सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

  • भारताला विकसित बनवण्यासाठी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रीत केले जाणार.

  • गर्भाशयाच्या तसेच मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार, यासाठी लसीकरण केले जाणार.

  • दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाणार. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जाणार.

  • आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पायाभूत सोयीसुविधांसाठी ११.११ लाख कोटींच्या तरतुदीचं नियोजन केलं जाणार.

  • करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. कररचनेत कोणताही बदल नाही करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT