Finance Minister Nirmala Sitharaman on agricultural budget 2024 Saam TV
Budget

Agriculture Budget 2024: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 'लाख'मोलाचं गिफ्ट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Budget 2024 announcement for farmers and agriculture sector: अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची कृषी क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आलीय. याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई: अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलीय. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी योजना तयार करण्यात येणार आहेत. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (Budget) कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता वाढविण्यासाठी योजनेची घोषणा केलीय. सीतारामन यांनी, कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची घोषणा केलीय. त्यांनी सांगितलं की, सरकार देशात राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. त्यासोबतच भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना देखील (Finance Minister Nirmala Sitharaman) आणणार आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. या निधीमधून कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी योजना तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं (Provision In Budget For Farmers And Agriculture Sector) आहे. ३२ पिकांसाठी १०९ जाती लाँच करणार आहेत. तर कृषी क्षेत्राच्या विकासाला प्रथम प्राधान्य येणार असल्याचं सीतारामन अर्थसंकल्पात मांडलं आहे.

नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर

नैसर्गिक शेती वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. हा अर्थसंकल्प गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर केंद्रित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी अर्थसंकल्प सादर करत (Union Budget 2024) आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून महागाई नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taapsee Pannu Fitness Tips: तापसीसारखी फिगर हवी आहे? फिटनेससाठी या टिप्स फॉलो करा

Winter Season: थंडीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Anupam Kher: वयाच संबंध नाही! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

SCROLL FOR NEXT