Budget 2024 Saam Tv
Budget

Budget 2024: अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार? 'ही' मोठी घोषणा होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Provisions For Farmers In Budget 2024

येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. यावेळी देखील कृषी क्षेत्रासाठी पूर्वीपेक्षा जास्त निधी दिला जाऊ शकतो, अशी संभावना आहे. या आर्थिक वर्षातही कृषी कर्ज वितरण निधीत वाढ होण्याची शक्यता आहे. (latest budget update)

आगामी अंतरिम अर्थसंकल्पात (Budget 2024) सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचा निधी 22-25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करू शकते. तसंच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संस्थात्मक कर्ज मिळण्याची शाश्वती मिळतेय. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारचे कृषी कर्जाचं उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपये आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांसाठी योजना

सध्या सरकार सर्व वित्तीय संस्थांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दोन टक्के व्याज सवलत देत आहे. शेतकऱ्यांना वर्षाला सात टक्के सवलतीच्या दराने तीन लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज मिळत (Provisions For Farmers In Budget) आहे.

वेळेवर व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला तीन टक्के अतिरिक्त व्याज सवलतही दिली जात आहे. शेतकरी दीर्घ मुदतीचे कर्ज देखील घेऊ शकतात, परंतु व्याज वेगळा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचा निधी 22-25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते. कृषी-कर्जांवर अधिक लक्ष दिले जात आहे. सरकार उरलेल्या पात्र शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना कर्जाच्या नेटवर्कमध्ये आणण्यासाठी अनेक मोहिमा राबवत आहे. कृषी मंत्रालयाने एका केंद्रित दृष्टिकोनाचा भाग म्हणून 'क्रेडिट' (कर्जासाठी) एक स्वतंत्र विभाग देखील तयार केला आहे, अशी माहिती (Budget 2024) मिळतेय.

गेल्या 10 वर्षात (Provisions For Farmers In Budget) विविध कृषी आणि संलग्न कामांसाठी कर्ज वाटप उद्दिष्टांपेक्षा जास्त प्रमाणात झालं आहे. सरकारी आकडेवारी दर्शवते की चालू आर्थिक वर्षात, डिसेंबर 2023 पर्यंत 20 लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाच्या उद्दिष्टापैकी सुमारे 82 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालंय. मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या कालावधीत खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही बँकांनी सुमारे 16.37 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केलं आहे.

या आर्थिक वर्षातही कृषी कर्ज वितरणाचं (Budget 2024) उद्दिष्ट ओलांडण्याची शक्यता आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण कृषी कर्ज वाटप 21.55 लाख कोटी रुपये होते. या कालावधीसाठी निर्धारित केलेल्या 18.50 लाख कोटी रुपयांच्या निधीपेक्षा अधिक होते. किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या नेटवर्कद्वारे 7.34 कोटी शेतकऱ्यांना कर्ज मिळालं आहे. 31 मार्च 2023 पर्यंत सुमारे 8.85 लाख कोटी रुपये थकीत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT