Budget Session 2024 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget Session 2024: सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या...; वाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणातले महत्त्वाचे मुद्दे

Parliament Budget Session 2024 Updates: लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले.

Ruchika Jadhav

President Droupadi Murmu address in Parliament:

गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत अभिभाषण केले. यावेळी त्यांनी राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, अनुच्छेद ३७० आणि तरुणांना रोजगार या काही ठळक मुद्द्यांवर सरकारच्या विकासकामांची माहिती दिली.

नव्या संसद भवन इमारतीमधील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हे पहिले भाषण होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी याबाबत आठवण करून दिली. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले.

भारतीय संविधान लागू होऊन आता ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठलेत. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. तसेच जी२० शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी शक्तीशाली आहे अशी झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील विकासकामांचं कौतुक केलंय.

आमच्या सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत आरक्षण मिळाले, असं मुर्मू यांनी म्हटलं. भाषणात त्यांनी तिहेरी तलाखचा विषय देखील मांडला.

अर्थव्यवस्थेबाबत बोलताना मुर्मू म्हणाल्या की, एक देश, एक कर या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. देशात सर्वत बँकांचे जाळे आधीपेक्षा आता आणखी मजबूत झाले आहे. बँकाचे एनपीएमध्ये घट झाली आहे. आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट झाली आहे. डिजिटल इंडियामुळे नागरिकांना व्यवसायात याचा मोठा फायदा होतोय. जगातील इतर देशही आता यूपीए सारखे व्यवहार आपल्याकडे सुरू करण्याचा प्रयत्न करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT