Budget 2024 Live Saam TV
Budget

Budget 2024: शेतकरी, महिला आणि तरुण...; बजेटच्या सुरुवातीलाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय सांगितलं?

Ruchika Jadhav

Nirmala Sitharaman Speech:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. निर्मला सीतारामन यंदा सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारे काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी सीतारामन यांनी आजवर केलेल्या कामांची आठवण करुन दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील सर्व व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. वीवीध जमातींसाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोच्या आहेत. सरकार गरिबी हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आजवर आलेल्या सर्व आव्हानांचा सरकारने धैर्याने सामना केला आहे.

शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर

ग्रामीण विकासाच्या उपयुक्त योजना राबविण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. तर ११.८ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिलीये.

तरुणांच्या सक्षमीकरणावर काम

सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलं जात आहे. आतापर्यंत ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी मोठी कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केलंय. महिलांसाठी सरकार सक्षम आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे, असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

भ्रष्टाचार पूर्णपणे संपवला

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी विरोधकांवर देखील निशाणा साधला. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे, असं त्या म्हणाल्या. भाषणात पुढे त्या म्हणाल्या की, प्रत्येक घरात पाणी, वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम सरकारने केले आहे. गरजू नागरिकांसह सर्वांच्याच अन्नविषयक समस्या दूर केल्यात. आतापर्यंत ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT