Union Budget 2025 Highlights

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Ration Card : ज्या रेशनकार्डधारकांना सहा महिन्यांपासून रेशन न धान्य घेतलं नाही, त्यांचे धान्य वाटप बंद करण्यात येणार आहे. सरकारचा निर्णय काय आहे का घेण्यात आलाय हा नियम जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत रेशन न घेतल्यामुळे हा निर्णय

  • सहा महिन्यांत धान्य न घेणाऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आलं.

  • सरकारनं अपात्र लाभार्थी व निष्क्रिय कार्डधारकांवर कारवाई सुरू केली आहे.

तुमच्याकडे रेशनकार्ड आहे, पण तुम्ही त्याचा उपयोग रेशन घेण्यासाठी नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारनं रेशन न घेणाऱ्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. जानेवारी ते जून या कालावधीत रेशन दुकानातून धान्य घेतले नाहीत. त्याच्या धान्य वाटपावर बंदी करण्यात येणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे.

दरम्यान सहा महिन्यात रेशन दुकानात धान्य न घेणाऱ्यांचं त्यांचे धान्य वाटप तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ३,०९७ शिधापत्रिकाधारकांनी जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत रेशन दुकानातून धान्य उचलले नाही, म्हणून त्यांचे धान्य वाटप बंद करण्यात आलंय. शहरातील रेशन विभाग तीन झोनमध्ये विभागलेला आहे.

अ (निगडी), ज (पिंपरी) आणि फ (भोसरी) एकूण ४,८९ ,३८७ लाभार्थ्यांना रेशनचा लाभ दिला जातोय. यातील ३,७१० अत्याधुनिक योजना लाभार्थी आणि ८८,६४१ शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेतील आहेत. दरम्यान प्रशासनाचा खरा हेतु हा खऱ्या गरजू लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ मिळवून देणे आहे.

'ज' झोनमधील अपात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या नावावरून धान्य वाटप कायमस्वरूपी थांबविले जाणार आहे. तसेच नवीन पात्र लाभार्थींची निवड सातत्याने सुरू आहे. जानेवारी ते जून या कालावधीत धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांच्या जागी अपंग, निराधार, विधवा आणि गरजू नागरिकांना रेशनचा लाभ दिला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT