Budget 2024 Saam Tv
Budget

Budget 2024: अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून घ्यायचाय? जाणून घ्या 'या' शब्दांचा अर्थ

Budget Financial Terms: सरकार जेव्हा अर्थसंकल्प सादर करतं, तेव्हा त्यात अनेक आर्थिक संज्ञा वापरल्या जातात. अनेकदा या शब्दांमुळे आपल्याला अर्थसंकल्प समजणं अवघड होतं. आज आपण अशा काही खास शब्दांचा अर्थ जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Interiam Budget Financial Terms Meaning

सर्वसामान्यांचंही अर्थसंकल्पावर विशेष लक्ष असतं. आगामी आर्थिक वर्षात सरकार कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. या वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. पण अर्थसंकल्प सादर करताना असे काही शब्द (Budget Financial Terms) वापरले जातात, ज्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात, अशा शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊ या. (latest budget update)

झिरो-बजेट

अर्थसंकल्प सादर करताना झिरो-बजेट हा शब्द वापरला जातो. हा शब्द कृषी क्षेत्रासाठी वापरला जातो. याचा अर्थ हानीकारक रसायनांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर शेतीसाठी करता (Financial Terms Meaning) येईल. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारचा हा निर्णयय सेंद्रिय शेतीला चालना देण्याबरोबरच शेतीसाठी होणारा खर्च कमी करण्यास मदत करते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विनिमय दर

भारताला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यापैकी एक निर्यात आहे. भारताला निर्यात पातळी वाढवण्यासाठी किंवा कायम ठेवण्यासाठी दुप्पट मदतीची गरज (Interiam Budget) आहे. याशिवाय परकीय चलनाची देवाणघेवाण करणे हेही एक आव्हान आहे. विनिमय दर म्हणजे एका चलनाची दुसऱ्या चलनाच्या तुलनेत होणारी किंमत आहे. उदाहरणार्थ, भारत कच्च्या तेलाची खरेदी रुपयात नव्हे तर अमेरिकन डॉलरमध्ये करणे.

संपत्ती निर्मिती

देशाच्या विकासासाठी अनेक आव्हाने आहेत. यापैकी एक म्हणजे संपत्ती निर्मिती. अनेक लोकांकडे पैसे आहेत, परंतु काही लोकांकडे खूप कमी पैसे आहेत. त्यांना खूप कमी मजूरी मिळते. अर्थसंकल्पात संपत्ती निर्माण हा शब्द वापरला जातो. यामध्ये सरकार मजूरीसाठी किती खर्च करणार आहे, याचा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर सरकारकडे किती पैसा आहे, हे सांगितलं जातं.

फायनान्शियल ओव्हरव्ह्यू म्हणजे काय

जेव्हा नवीन कर प्रणाली किंवा कर प्रणालीमध्ये बदल केला जातो, तेव्हा वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांना फायनान्शिअल ओवरव्ह्यू म्हणतात. हे धोरणं सादर करण्यासाठी वापरले (Budget Financial Terms Meaning) जाते.

निर्गुंतवणूक

सरकारकडून अनेकदा सार्वजनिक क्षेत्राला शेअर्स विकले जातात. अधिक महसूल मिळवण्यासाठी संस्थेचा किंवा सरकारच्या मालकीचा काही भाग विकण्याची प्रक्रिया म्हणजे निर्गुंतवणूक (budget 2024) होय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT