Tax Slab yandex
Union Budget 2025 Highlights

Tax Slab : १० लाखांच्या कमाईवर टॅक्स कसा वाचवू शकतो? नव्या अन् जुन्या करप्रणालीत काय फरक?

Old vs New Tax Regime for 10% Slab : इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अनेकांनी गुतंवणुकीच्या योजना सुरू केल्या आहेत. जर तुम्ही १० टक्क्यांच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तर तो कसा वाचवू शकतो आणि जुन्या आणि नव्या करप्रणालीमध्ये काय फरक आहे, हे जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर असलेल्या कर रचनेच्या आधारे कर आकारते. करदाता नेहमी कर कसा वाचवता येईल हे बघतो. त्यासाठी मग वेगवेगळे मार्ग शोधले जातात. मागच्या बजेटमध्ये कर रचनेत (Income Tax) बदल करण्यात आला होता. या नव्या कर प्रणालीमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते. नवीन करप्रणाली अंतर्गत स्टॅंडर्ड डिडक्शन ५०,००० वरुन ७५००० करण्यात आलं. तसेच फॅमिली पेन्शन डिडक्शन १५,००० वरुन २५,००० करण्यात आलं.

जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली ( Old Tax Regime vs New Tax Regime)

नवीन आयकर मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर भरताना तुम्ही नवी किंवा जुनी करप्रणाली निवडू शकता. जुन्या कर प्रणालीनुसार, (FY2023-FY2024) जर तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे; तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. २.५ ते ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्यास ५ टक्के टॅक्स भरण्याची तरतूद आहे. तसेच याआधी ५ ते १० लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्यास २० टक्के कर आकारले जाते. तर १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचा ३० टक्क्यांच्या कररचनेत समावेश करण्यात आला होता.

नवीन कर प्रणालीनुसार (FY2024-FY2025) ३ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर आकारला जाणार आहे. तर ३ ते ६ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के कर आकारण्यात येईल. ६ ते ९ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर १० टक्के कर आकारण्यात येणार आहे. तसेच ९ ते १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांचा १५ टक्के कर रचनेत समावेश करण्यात आला आहे. नवीन करप्रणाली अंतर्गत, करदात्यांना फक्त मर्यादित कर सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे, तुमच्याकडे किमान गुंतवणूक असल्यास नवीन करप्रणाली निवडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. अर्थात त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांकडून सल्ला घेऊ शकता.

१० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स कसा वाचवू शकतो?

या क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळींच्या माहितीनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपर्यत असेल तर तुम्हाला तुमच्या पगारावर ३० टक्के कर भरावा लागेल. परंतु वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता.

१. स्टॅंडर्ड डिडक्शनमुळे ५० हजारापर्यंतची सूट मिळणार आहे.

२. PPF, EPF,ELSS, NSC सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कलम 80 C अंतर्गत १.५ लाख रुपयांचा कर वाचवू शकता. १० लाखांतून १.५ लाख वजा केल्यास ८.५ लाखांच्या कमाईवर कर आकारला जातो.

३. जर तुम्ही नॅशनल पेन्शन योजनेत वार्षिक ५० हजारापर्यंतची गुंतवणूक केली तर 80CCD (1B) अंतर्गत तुम्हाला अतिरिक्त 50 हजार रुपयांचा आयकर वाचवण्यात मदत मिळते.

४. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर कलम 24B च्या अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता.

५. तसेच तुम्ही एखादी मेडिकल पॅालिसी घेतली असेल, तर कलम 80D अंतर्गत २५ हजार रूपयांपर्यंतचा कर वाचवला जाऊ शकतो.

कलम 80C

कलम 80C अंतर्गत एकूण उत्पन्नातून दरवर्षी 150,000 रूपयांपर्यंत डिडक्शन म्हणून दावा केला जाऊ शकतो. कंपन्या, भागीदारी कंपन्या आणि एलएलपी या सवलतीचा लाभ घेऊ शकत नाहीत. काहीवेळा, तुमच्याकडे 80C साठी पात्र सवलत किंवा गुंतवणूक असू शकतात; परंतु तुम्ही तुमच्या नोकरीचा पुरावा सादर केलेला नसेल तर अतिरिक्त TDS कापला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे संपूर्ण कर भरल्याचे पुरावे आहेत, तर तुम्ही ई-फायलिंग करताना या सवलतीचा दावा करू शकता.

टर्म इन्श्युरन्स

प्राप्तिकर कायदा, 1961 (ITA) नुसार, विम्यावर अनेक प्रकारची कर सवलत मिळते. तुम्ही जर टर्म लाइफ इन्श्युरन्स घेतले असेल तर तुम्ही या सवलतीचा फायदा घेऊ शकता. प्राप्तिकर कायदा 1961 मधील कलम 80C नुसार जीवन विमा पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर कर सवलत मिळू शकते. यावर 1.5 लाखापर्यंतचं डिडक्शन दिलं जातं.

होम लोन टॅक्स बेनिफिट

तुम्ही गृहकर्ज घेतलं तर EMI द्वारे परतफेड करता. परतफेड करताना बँका व्याज आकारत असतात. त्या व्याजकपातीच्या रकमेवर तुम्ही दावा करू शकता. घर बांधण्यासाठी मिळणारे कर्ज महाग असू शकते, परंतु अनेक कर सवलतींचा लाभ मिळणे देखील शक्य आहे. जे तुम्हाला दरवर्षी कर वाचवण्यास मदत करू शकते.

कर सवलतीचा दावा करण्यासाठी घराच्या मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. जर ते घर बांधण्यासाठी घेतले असेल, तर ज्या आर्थिक वर्षात कर्ज घेतले होते, ते आर्थिक वर्ष संपल्यापासून पाच वर्षांच्या आत बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. EMI द्वारे परतफेड करतो, त्यावर व्याज आकारला जातो. त्यावर कलम 24 अंतर्गत तुमच्या एकूण उत्पन्नातून कमाल 2 लाख रुपयांपर्यंत डिडक्शन म्हणून दावा केला जाऊ शकतो.

Edited By: Priyanka Mundinkeri

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT