Niramala Sitaraman Family Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Niramala Sitharaman Family: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? पती, मुलगी अन् जावयाबद्दल जाणून घ्या

Niramala Sitharaman Husband And Daughter Biography: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन या त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असतात. त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. निर्मला सितारामन या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन नवीन विक्रम रचणार आहे. अर्थसंकल्पात कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. निर्मला सितारामन या त्यांच्या साध्या राहणीमानामुळे खूप चर्चेत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कोणालाच माहित नाही. त्यांच्या कुटुंबात त्यांचे पती परकला प्रभाकर, मुलगी वांग्मयी परकला आणि जावई प्रतिक दोशी आहेत.

निर्मला सितारामन यांचे पती (Nirmala Sithraman Husband)

निर्मला सितारामन या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात शिकत असताना त्यांची ओळख परकला प्रभाकर यांच्यासोबत झाली. ते सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि कॉमेंटेटर होते. परकला प्रभाकर हे मूळचे आंध्र प्रदेशमधील नरसापुरमचे आहेत. त्यांनी १९८६ मध्ये लग्न केले. त्यांनी एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव वांग्मयी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला सितारामन यांची मुलगी पत्रकार आहे. त्यांनी यापूर्वी द हिंदू आणि मिंट यासाठी काम केले आहे. तर त्यांचे पती परकला प्रभाकर यांनी २०१४ ते २०१८ या कालावधी आंध्र प्रदेशचे संपर्क सल्लागार म्हणून काम केले आहे.

निर्मला सितारामन यांची मुलगी वांगमयी (Nirmala Sitharaman Daughter)

वांगमयी परकला यांचा जन्म २० मे १९९१ रोजी झाला. त्यांनी मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली. त्यांनी दिल्लीतून इंग्रजी साहित्यात बॅचलर पदवी मिळवली. तर अमेरिकेतली नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली.

निर्मला सितारामन यांचे जावई (Niramala Sitharaman Daughter In Law)

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या मुलीने प्रतीक दोषी यांच्याशी लग्न केले आहे. प्रतिक दोषी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सहकारी आहेत. वांगमयी या लेखिका आहेत. त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतीक दोषी हे मूळचे गुजरातचे आहेत. २०१४ पासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम केले आहे. ते सध्या पीएमओमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT