cancer medication price reduction SAAM TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2025 : कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, जिल्हा रूग्णालयात कॅन्सर सेंटर उभारणार; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची महत्त्वाची घोषणा

Cancer Medicine Price Reduction in Budget 2025 : बजेटमध्ये आरोग्य क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुर्धर आजार कॅन्सरला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. या बजेटमधून सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहे. त्याचसोबत आरोग्य क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुर्धर आजार कॅन्सरला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

कॅन्सर डे केअर सेंटर उभारणार

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं आहे. पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये 200 कर्करोग केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आहे. हे लक्षात घेऊन सरकारने आता हा मोठा निर्णय घेतला आहे.

कॅन्सरची औषधं होणार स्वस्त

या बजेटमध्ये अजून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ती म्हणजे कॅन्सरच्या औषधांबाबत. कर्करोगासह गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ जीवनरक्षक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर आता स्वस्तात उपचार करता येणार आहेत. वाढता वैद्यकीय खर्च पाहता सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेडिकल कॉलेजेसमध्ये जागा वाढ

केंद्र सरकारने मेडिकलच्या जागाही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील 5 वर्षात वैद्यकीय जागांमध्ये 75,000 ने वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरम्यान निर्मला सीतारामन यांचा हा लागोपाठ आठवा अर्थसंकल्प आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT