FM Nirmala Sitharaman on Housing Sector Budget 2024 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Housing Sector: खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर; 3 कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

Budget 2024 For Real Estate Sector: 3 Crore People Will Get Houses: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचं घर मिळणार, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

Satish Daud

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचं घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, त्यांना आता हक्काचं घर मिळणार आहे.

संसदेत अर्थसंकल्प मांडताना (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेचे उद्दिष्टं गरीबांना तसेच हक्काचं घर मिळायला हवं असा आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही ही योजना सुरू केली होती".

"या योजनेअंतर्गत मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण भागात २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.आतापर्यंत आम्ही कोट्यवधी लोकांना हक्काचं घर बांधून दिलंय. आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) अधिकचा निधी देऊन २०२५ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात ३१.४ लाख घरे बांधण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या या घोषणेनंतर संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार घराच्या किमतीच्या ६० रक्कम टक्के खर्च करते. उर्वरित खर्च राज्य सरकारे उचलतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT