Budget 2024 Saam Tv
Budget

Budget 2024: देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होणार सादर; कुठे आणि कसा LIVE पाहता येणार? वाचा सविस्तर

Budget 2024: देशाचा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हा अर्थसंकल्प कुठे आणि कसा पाहता येणार आहे ते जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget 2024 Will Announced In 1 February 2024:

देशाचा अर्थसंकल्प उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. संसदेत उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या अर्थसंकल्पाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या सकाळी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो? त्यांच्यासंबंधित अनेक योजना या अर्थसंकल्पात जाहीर केल्या जाणार आहेत.

देशाचे अर्थसंकल्प कुठे आणि कसे पाहता येणार?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. हे अर्थसंकल्प तुम्ही तुमच्या घरी टीव्हीवर पाहू शकता.

संसद टीव्ही आणि दूरदर्शन

संसद टीव्ही आणि दूरदर्शन या चॅनलवर अर्थसंकल्पाचे थेट प्रसारण होणार आहे. तसेच त्यासंबंधित युट्यूब चॅनलवरदेखील पाहू शकतात.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो(PIB)

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच अनेक वृत्तवाहिन्यांवर अर्थसंकल्प दाखवले जातील.

वेबसाइट्स

अनेक वृत्तवाहिन्यांच्या वेबसाइटवर अर्थसंकल्पाचे अपडेट दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT