Plastic Road Saam TV
ब्लॉग

Plastic Road : प्लॅस्टीकचे रोड आपल्याकडे देखील गरजेचे...

प्लॅस्टीकच्या रस्त्यांमुळे प्रदुषण कमी होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वेश रविंद्र तरे -

आपणा सर्वांनाच प्लॅस्टीक (Plastic) बद्दल माहित असणारी गोष्ट म्हणजे प्लॅस्टीक ही न गंजणारी, वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ परंतू प्लॅस्टीक (Decompose) म्हणजेच नष्ट होत नाही. आणि त्यामुळे प्लॅस्टीकमुळे मोठ्या प्रमाणात कचरा (Garbage) होतो म्हणून देशात प्लॅस्टीक बंदी (Plastic ban) देखील केली होती हो म्हणजे आता सर्रास लोक ते वापरतात म्हणून बंदी आहे असं मी म्हंटल नाही. मात्र प्लॅस्टीक हे नष्ट होत नाही याच प्लॅस्टीकच्या गुणधर्माचा योग्य पध्दतीने वापर करुण भारतातील शास्त्रज्ञ डॉ.राजगोपालन वासुदेवन (Dr. Rajagopalan Vasudevan) यांनी ‘प्लॅस्टीक रोडची’ संकल्पनाना सत्यात उतरवली आणि त्याआधारे ते 2001 पासून यशस्वी प्लॅस्टीकचे रस्ते बनवत आहेत. (You also need a plastic rod)

हे देखील पहा -

शास्त्रज्ञ डॉ.राजगोपालन वासुदेवन यांच्या संशोधनातून असं दिसून आलं की डांबर (Bitumen)आणि प्लॅस्टीकचे बंध रस्त्यांना अधिक मजबुती देतात. एक किलोमीटर रस्ते बांधणीला साधारण 10 टन डांबर लागते परंतू हेच रस्ते बनविण्यासाठी डॉ.राजगोपालन हे 9 टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरतात आणि प्लॅस्टीकच्या वापरामुळे त्याचा कचरा कमी होऊन साहजिकच प्रदुषण कमी होण्यास मदत होते आणि रस्ते बांधणीचा खर्च देखील कमी होतो एवढेच नव्हे तर प्लॅस्टीकचा वापर करुण बांधलेले रस्ते जवळपास 10 वर्ष टिकतात. हे प्लॅस्टीक रस्ते बनविण्याची पध्दत सुध्दा साधारण आणि सोप्पी आहे.

प्लॅस्टीक रस्त्यांची बांधनी -

170 डीग्री तापमानात खडीला गरम केले जाते आणि त्यामध्ये प्लॅस्टीक मिक्स केले जाते आणि या उष्णतेमध्ये अवघ्या काही सेकंदात प्लॅस्टीक वितळले जाते आणि त्यामध्ये 160 डीग्रीच्या तापमानावर तापवलेले डांबर ओतले जाते या साऱ्याच्या मिश्रणातून जो बंध तयार होतो तो ‘प्लॅस्टीक रोड’साठी वापरला जातो!

प्लॅस्टीकच्या रस्त्यांचे फायदे -

प्लॅस्टीकच्या रस्त्यांमध्ये वजन झेलण्याची क्षमता या रस्त्यांमध्ये असते शिवाय प्लॅस्टीक पासून बनवलेल्या रस्त्यांवरती पाणी साठत नाही ज्यामुळे खड्डे पडत नाहीत. आणि जवळपास 10 वर्षापर्यंत मेंटेनंस नाही. टाकाऊ प्लास्टिकचे टिकाऊत रुपांतर होण्यास मदत होते. डॉ. राजगोपाल वासुदेवन यांनी त्यांच्या युनिवर्ससीटीच्या नावे हा पेंटट केला आहे. त्यांनी हा प्रयोग भारत सरकारला Government of India विनामुल्य दिला आहे. 2018 साली त्यांना ‘पद्मश्री’ (Padma Shri) पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं आहे.

डॉ.राजगोपालन यांच्या प्रयोगासारखाच पुढचा टप्पा नेदरलॅंड मध्ये प्लॅस्टीक रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात आले. ज्यात प्लॅस्टीक रोड खालीच पाण्याचे योग्य निचरा होण्यासाठीची प्रणाली पध्दल अवलंबली आहे. मुळात भ्रष्टाचार करायचाच असेल तर अगदी लोखंडाचा रस्ता बनवला तरी दोन दिवसात खड्डे पडणार काहीतरी नवीन आणि नागरिकांना सोयीचं असं जर खरचं द्यायची लोकप्रतिनिधी आणि शासनाची मानसिकता असेल तर असे प्रयोग होतात नाहीतर ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत दरवर्षीचे रस्ते कमी खड्डेच जास्त'!

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "१० कोटी रुपये दे, नाहीतर..."; प्रसिद्ध गायकाला बिश्नोई गँगची जीवे मारण्याची धमकी

Mangalsutra Designs: नव्या नवरीसाठी खरेदी करा 5 लेटेस्ट मंगळसूत्र, लूक दिसेल उठून

Heart Attack: डॉक्टरांनी सांगितल्या ४ सवयी ज्या वाढवतात हार्ट अटॅकचा धोका; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Ladki Bahin Yojana : एकत्र ₹३००० का नाहीत? लाडक्या बहि‍णींचा संताप, थेट महामार्ग रोखला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

SCROLL FOR NEXT