मुंबई महापालिकेच्या (BMC Elections 2022) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केलीय. राजकीय पक्षाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असताना या निवडणुकांमध्ये युती (political alliance) किंवा आघाडी होणार का? असे प्रश्न विचारले जातात होते. पण २०१७ च्या निवडणुकांप्रमाणे येणाऱ्या निवडणुका देखील प्रत्येक पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं हळूहळू स्पष्ट होतंय. त्यादिशेने पावलं उचलण्यास या पक्षांनी सुरुवात केलीय. (Will all parties fight on their own in Mumbai Municipal Corporation elections this year?)
हे देखील पहा -
२०१७ च्या निवडणूकीमध्ये विजयी उमेद्वारांचं सध्या मुंबई महापालिकेत पक्षीय बलाबल खालील प्रमाणे:
शिवसेना (Shivsena): ९३ जागा
भाजप (BJP): ८२ जागा
काँग्रेस (Congress): ३१ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): ९ जागा
मनसे (MNS): १ जागा
सपा (SP): ६ जागा
एमआयएम (AIMIM): २ जागा
अपक्ष (Other): ६ जागा
प्रत्येक पक्षाने युती न करता २०१७ मध्ये आपआपली ताकत आजमावून पहिली होती. त्यात मिळालेलं यश भाजपला उभारी देणारं होत. शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरी शिवसेनेसह इतर पक्षांना हे यश विचार करायला लावणारं होतं. येत्या निवडणुकांवेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर भाजप विरोधी पक्षात बसलं आहे. शिवसेनेसमोर सत्ता कायम राखण्यासाठी भाजपचं तगडं आव्हान आहे, पण यावेळी राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला राष्ट्रवादी पक्षाची मदत होण्याची शक्यता आहे. यात काँग्रेस मात्र स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. भाजप देखील त्याच मनस्थितीत असताना मनसे सोबतच्या युतीच्या केवळ चर्चा सुरू आहेत. पण ही युती खरंच होईल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणारच आहे.
मुंबईत मराठीच्या मुद्यावर शिवसेना, मनसे पक्षाला होणारं मतदान पाहता भाजपने देखील मराठी कट्टा ही मोहीम सुरू केलीय. पण भाजपसाठी निर्णयाक ठरणारी मतं म्हणजे गुजराती समाजाचे मतदार, आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि आप पक्ष प्रयत्नशील आहेत. तर उत्तर भारतीय मतदार हे याआधी काँग्रेसकडे जात होते, ते मागच्या निवडणुकांमध्ये भाजपकडे वळले, पण ते आताच्या राजकीय परिस्थितीमुळे यावेळी भाजपसोबत राहील का? हा प्रश्न आहे. तर मुस्लिम समाज मागील निवडणुकांमध्ये MIM पक्षाला मदत करताना दिसला पण गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ती ताकद दिसली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस वा आप पक्षाला हा मतदार आपल्याकडे खेचता येणं शक्य आहे.
जातीय आणि प्रांतिक समीकरण जुळवल्यास या वेळी सगळ्याच पक्षांना ही निवडणूक लढवताना आपापलं संख्याबळ वाढवण्यासाठी वाव आहे आणि यावेळी हे समीकरण कोणाला जुळवता येईल, मुंबई त्याच पक्षाला आपली करता येणार आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.