Raj Kumar Birthday Special Saam TV
ब्लॉग

Raj Kumar : बॉलिवूडमध्ये स्वत:च्या अटींवर काम करणारा अभिनेता!

तिरंगा, सौदागरसारखे अनेक चित्रपट राजकुमार यांनी आपल्या अभिनयानं अजरामर करून टाकले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

श्रीकांत घुले, साम टीव्ही

बॉलीवूडमध्ये स्वत:च्या अटींवर काम करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार. त्यांची आज जयंती. तिरंगा, सौदागरसारखे अनेक चित्रपट राजकुमार यांनी आपल्या अभिनयानं अजरामर करून टाकले आहेत. राजकुमार यांच्या चित्रपटातील डायलॉग्ज गाजले ते केवळ त्यांच्या शब्दफेकीच्या एक विशेष लकबीमुळे. राजकुमार यांची डायलॉग डिलिव्हरी आजही वादातीत आहे.

8 ऑक्टोबर 1926 ला एका काश्मिरी कुटुंबात राजकुमार यांचा जन्म झाला. राजकुमार यांचं खरं नाव कुलभूषण पंडित होतं. सब-इन्स्पेक्टरची नोकरी सोडून राजकुमार अभिनयाकडे वळले. मदर इंडिया, सौदागर, तिरंगा, मरते दम तक, नील कमल, पाकीजा, दिल अपना प्रीत पराई, पुलिस और मुजरिम अशा अनेक चित्रपटातून राजकुमार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले.

राजकुमार यांच्याशी अनेक किस्से आजही मनोरंजन विश्वात चर्चीले जातात. त्यातलाच एक म्हणजे, चित्रपट फ्लॉप गेला तरी ते त्यांच्या मानधनात वाढ करत असत. त्यावर राजकुमार एकदा म्हणाले होते, फिल्मे फ्लॉप हो सकती है, लेकीन मै नही´. राजकुमार यांच्या जगण्यात,वागण्यात,बोलण्यात एक स्वॅग होता.

दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर एका चित्रपटाची ऑफर घेऊन राजकुमार यांच्याकडे गेले होते. राजकुमार यांना स्क्रिप्ट आवडली नाही. मात्र, राजकुमार यांनी सरळ नकार दिला नाही. आपल्या घरातील पाळीव कुत्र्याला बोलावलं आणि विचारलं, आपकी क्या राय है. यह फिल्म करे या नही? त्यावर बिचारं कुत्र काय बोलणार.

नंतर राजकुमार रामानंद सागर यांना म्हणाले, देखा, ये रोल तो मेरा कुत्ता भी नही करना चाहेगा. राजकुमार असे होते. त्यांच्या फटकळ स्वभावाचा त्यांनी अनेकदा व्यावसायिक आयुष्यात फटकाही बसला. पण त्याची पर्वा केली नाही म्हणूनच ते राजकुमार बनले. अशा या मस्तमौला अभिनेत्याला साम टीव्हीकडून विनम्र अभिवादन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT