नितेश नारायण राणे Saam Tv
ब्लॉग

संतोष परब हल्ला त्यानंतर दिशा सालीयन प्रकरण; राणें कुटुबियांच्या अंगलट, अटकेची शक्यता?

दिशा सालियन प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या राणे पिता पुत्राच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: दिशा सालियन प्रकरणी ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या राणे पिता पुत्राच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावलीय.

राज्याच्या राजकारणात सध्या दिशा सालीयन (Disha Saliyan) नावाने सुरू असलेले राजकारण थांबताना दिसत नाहीय..सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर दिशा सालीयनचा  मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलं आणि राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केलेत. आता वर्ष उलटूनही हे प्रकरण काही मिटत नाहीय. नुकतेच राणेंनी दिशा सालीयन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे म्हणत पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढला. मात्र आता यावरून राणेंच्या अडचणी वाढल्यात.

राणेंच्या या दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लागलीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे. आता तर नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावलीय. नितेश राणेना ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितलय. दरम्यान नितेश राणेंनी आमचे वकील उत्तर देतील असे सांगितले.

हे देखील पहा-

आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वक्त्यवयानंतर राणे अडचणीत आले होते. तर नितेश राणे हे देखील संतोष परब हल्ल्यानंतर अडचणीत होते. आता तर दिशा प्रकरणामुळे राणे पिता पुत्र अडचणीत आलेत. त्यामुळे आता दिशाबाबत केलेले वक्तव्य राणेंना भोवणार का? आणि त्यांना अटक होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT