Ratnagiri-Sindhudurg Loksabha 224  Saam TV
ब्लॉग

BLOG : लोकसभा उमेदवारीवरुन कोकणात राजकीय शिमगा?

Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha constituency Political News : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा करत किरण सामंतांचं नावही पुढं केलं. तर, आता खुद्द नारायण राणे यांच्याही नावाचीही चर्चा सुरु झालीये.

साम टिव्ही ब्युरो

ऋतुजा कदम

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जागेवरुन आता महायुतीत वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने तगडा उमेदवार देऊन किरण सामंत यांची लोकसभा लढवण्याची आशा मावळणार का? रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता महायुतीमधील वातावरण चांगलंच तापलंय. नेत्यांनी कितीही सर्व आलबेल असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला तरी, उमेदवारीचा वाद लपून राहिलेला नाही.

मतदारांमध्ये उमेदवार कोण? कुणाचं पारडं जड? कोणत्या पक्षाबद्दल सहानुभूती? याच्या चर्चा जोरात रंगत आहेत. अशावेळी आता राजकीय पक्ष आपले उमेदवारांची नावे जनतेसमोर आणू पाहत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट आणि भाजपमध्येच रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तयारी सुरु केलीय. शिंदे गटाकडून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. विशेष म्हणजे रोकेगा कौन, असं स्टेटस ठेवणाऱ्या किरण सामंतांनी काही तासांतच ''जर रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करणार'' असं सांगून जागा सोडण्याचीही तयारीही दर्शवली. मात्र शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा करत किरण सामंतांचं नावही पुढं केलं. तर, आता खुद्द नारायण राणे यांच्याही नावाचीही चर्चा सुरु झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरण सामंत यांनी रोकेगा कौन ? असं स्टेटस ठेवलं आणि चर्चेला फोडणी मिळाली. पण, काही वेळातच हे स्टेटम मागे घेऊन रवींद्र चव्हाण यांचा प्रचार करु असं म्हणत घुमजाव केलं. आधी आक्रमक भूमिका घेऊन वारंवार माघार घेणाऱ्या किरण सामंतांचा हेतू अजूनही स्पष्ट होऊ शकलेला नाही. स्टेटस ठेवून फक्त फोकसमध्ये राहण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत किरण सामंत यांनी यू-टर्न घेतला. किरण सामंत यांची कोकणात 'किंगमेकर' अशी ओळख आहे. लोकांची विविध कामं करण्यात ते सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचीही वेगळी शैली आहे. किरण सामंत बांधकाम व्यावसायिक असून यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. उदय सामंत यांच्या पाठीशी त्यांची भक्कम साथ आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटात सामील झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मशालीचं चिन्ह व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याने चर्चांना उधाण आलं होतं. ते ठाकरे गटात जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र काही वेळातच हे स्टेटस मागे घेण्यात आलं होतं. मात्र उदय सामंत यांच्या राजकीय करिअरसाठी निर्णय मागे घेतल्याचं बोललं गेलं.  (Maharashtra News)

विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. विनायक राऊतांच्या विरोधात शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे भाजपमधील स्थानिक नेते याठिकाणी आग्रही आहेत. भाजपमध्ये सध्या राणे आणि रवींद्र चव्हाण असे दोन गट आहेत. निलेश राणेंनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिल्यानंतर हा वाद समोर आला होता. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. तरीही, रवींद्र चव्हाण या जागेसाठी प्रयत्न करणार हे नाकारता येणार नाही. त्यामुळे महायुतीमधीलच दोन्ही पक्षांकडून आता फिल्डींग लावली जातेय. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी किरण सामंत यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले होते. महायुतीने पाठींबा दिल्यास किरण सामंत हे निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचा दावा उदय सामंतांनी केला. तर, या जागेवारील दावा आपण सोडला नसल्याचं उदय सामंतांनी ठणकाऊन सांगितलं. मात्र, याला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंनीही थेट इशाराच दिला. सामंतांनी या विषयात बोलू नये, युतीचं पावित्र्य ठेवायचं असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आहे.

गेल्या 10 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देण्यास शिंदे गट माघार घेणार नाही हे निश्चित. कारण, आगामी निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची झालीये. उमेदवार आमचाच असेल पण निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात येतंय. मात्र, दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांचं नावही अचानक चर्चेमध्ये येण्यासाठी अनेक कारणं आहेत. चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. पालकमंत्री झाल्यापासून सिंधुदुर्गासह रत्नागिरीत पक्ष वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेनं ते पार पाडतात अशी त्यांची ओळख आहे.

पण मग राणेंचं काय? नारायण राणेंची कोकणावर असलेली पकड, कार्यकर्त्यांचा पाठिंबा यावरुन नारायण राणेंना उमेदवारी देणार? नारायण राणे हे स्वत: माजी खासदार निलेश राणे यांच्यासाठी याच जागेसाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा होती. कारण, 2009 ते 2014 या कालावधीत निलेश राणे याच मतदारसंघाचे खासदार होते. मात्र, त्यानंतर त्यांचा 2014 आणि 2019 मध्ये पराभव झाला. पण, ते लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचं त्यांनी स्वत: स्पष्ट केलं. तसंच कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. कारण, गेल्या काही काळापासून तशा पद्धतीनं त्यांनी कामाला सुरुवात केल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे आता लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेमधून निलेश राणेंचं नाव तसं दूर झालंय असंच म्हणायला हवं. भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार हेदेखील याच रेसमध्ये असल्याचं चित्र आहे. प्रमोद जठार यांचं नावही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ उमेदवारीसाठी चर्चेत होतं , त्यांनी तयारी सुरु केली होती. यासंदर्भात जिल्हाभर त्यांनी दौरेही केले होते. उमेदवार म्हणून आमच्याही पक्षातील काहींची नावं सांगू शकतो, असा टोला त्यांनी नाव न घेता काही दिवसांपूर्वीच सामंत यांना लगावला होता.

उदय सामंत आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा अधिकच उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, किरण सामंत यांचे वाढदिवसानिमित्त लागलेले भावी खासदारचे बॅनर त्याचमुळे चर्चेचा विषय बनलाय. हे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावल्याने अजित पवार गटाचा किरण सामंत यांना पाठींबा आहे का ? अशा चर्चांनाही उधाण आलंय. शिंदे गटाला इथून जागा देण्याचा निर्णय झाल्यास दीपक केसरकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. दुसरीकडे, भाजपनं राज्यसभेवर खासदार असलेल्या मंत्र्यांना लोकसभेवर जिंकून येण्याचं सांगितल्याचं बोललं जातंय. त्याचमुळे नारायण राणे भाजपचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या वाढतच असल्याचं चित्र आहे. मात्र महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्याविरोधात विद्यमान खासदार विनायक राऊतांना लढताना त्यांचा कस लागणार आहे. खरंतर त्या दृष्टीनं आदित्य ठाकरे यांचे गेल्या काही काळातील कोकण दौरेही झाले.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा मतदारसंघ हा महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात सध्या भाजप देखील जोरदार तयारी करत आहे. येत्या काळात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा वाद अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंचे समर्थक किती? ठाकरेंचे समर्थक किती ? कुणाचं वर्चस्व इथं आहे ? हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. पण, याच मैदानात भाजपने उतरण्याची तयारी केली आहे. आणि त्याचमुळे हा सामना रंजक होणार आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता बदलेल्या राजकीय समीकरणानंतर कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

(वरील लेखात लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT