Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival Saam Tv
ब्लॉग

पुण्यात गणेशोत्सवात वाजणाऱ्या ढोल- ताशा पथकाची सुरुवात कधी झाली?

साम वृत्तसंथा

ईशान गोखले, साम टिव्ही

पुण्यात (Pune) दगड उचलून मारला तर तो एकतर एमपीएससी विद्यार्थ्यांना लागेल नाहीतर एखाद्या ढोल वादकाला. जून ते ऑगस्ट महिन्यात पुण्यातून फेरफटका मारला तर तुम्हाला ढोल ताशांचा आवाज ऐकायला मिळतो. अगदी कोथरूड पासून ते कात्रज आणि धायरीपासून ते धानोरी पर्यंत या महिन्यांमध्ये ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्रीच ऐकू येते. राज्यात बाकीच्या कुठल्याही शहरात अशी पथकं तुम्हाला दिसणार नाहीत. पण पुण्यात मात्र तुम्हाला ढोल ताशांची पथकं हाकेच्या अंतरावर दिसतील. जसं माशाला पोहायला शिकवलं जातं नाही तसंच पुण्यातल्या तरुणांना ढोल ताशांच्या नादाचा आणि ठेक्याचं शिक्षण द्यायची गरज पडत नाही. पण या पुण्यात ढोल ताशा पथकांची सुरुवात नेमकी कशी झाली हे आपण पाहूया.

महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणलं की मिरवणुका, ढोल ताशे, पारंपरिक वाद्ये या गोष्टी पटकन समोर येतात. या मिरवणुकांना पुण्यात फार महत्वाचं स्थान आहे. पुण्याच्या मिरवणुका आणि ढोल ताशा पथकं यांचा ऋणानुबंध फार पूर्वीपासून आहे.

ढोल ताशा पथकांची सुरुवात कधी झाली?

लोकमान्य टिळकांनी 1884 साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यांनतर हळूहळू गणेश मंडळे वाढत वाढत हजारोंच्या संख्येत गेली. या मंडळांच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्ये आणि नृत्ये खेळली जायची पण या उत्सवात ढोल ताशांच्या समावेश हा पहिल्यांदा 1965 साली झाला.

आप्पासाहेब पेंडसे म्हणजेच डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये बरची आणि ढोल ताशांचा खेळ सुरू केला. 1965 साली पुण्यातील गणेशोत्सवात दंगल झाली होती आणि पोलिसांनी मिरवणुकांमध्ये वाद्य वादनावर बंदी आणली. त्यावेळी अप्पासाहेबांनी स्वतः लक्ष्मी रस्त्यावर ताशा वाजवला. त्यांना लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. पुण्याच्या मावळ भागातील यात्रांमध्ये ढोल ताशांचा खेळ खेळला जायचा. आप्पासाहेबांनी हाच खेळ उचलत मावळी खेळाचं आणि शहरातील कवायतींचं मिश्रण करत हा उपक्रम पहिल्यांदा ज्ञान प्रबोधिनी शाळेत सुरू केला. यानंतर रमणबाग, विमलाबाई गरवारे प्रशाला, नुमवी म्हणजे नूतन मराठी विद्यालय या शाळांमध्ये ढोल ताशा खेळांना सुरुवात झाली. यानंतर पथकांची संख्या वाढतंच गेली.

आज पुण्यात नेमकी किती पथकं आहेत?

2022 गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळांची संख्या तब्बल 3600 हून अधिक असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. ज्याप्रमाणे गणेश मंडळांची संख्या वाढतीये त्याचप्रमाणे ढोल ताशा पथकांची संख्या ही वाढली आहे. ढोल ताश महासंघाच्या आकडेवारीनुसार आज पुण्यात 400 हून अधिक ढोल ताशा पथकं आहेत. सुरुवातीला लेझीम, बरची नृत्यांचा या पथकांमध्ये समावेश होता. आता यात गोंधळ, भांगडा, झांझ एवढंच नाही तर शंख वादनाचा ही समावेश झालाय.

कोणत्या पथकांना ऐकायला लोकं गर्दी करतात?

विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांना ऐकायला पुणेकर (Pune) लाखोंच्या संख्येत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करतात. यामध्ये सकाळी असणाऱ्या मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांमध्ये रमणबाग, शिवमुद्रा, शिवगर्जना, नादब्रह्म, ताल, शौर्य, रुद्रगर्जना, गजलक्ष्मी या पथकांचं वादन ऐकायला लोकं गर्दी करतात तर रात्री निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये एकीकडे डीजेच्या भिंती दणाणत असताना श्रीराम, परशुराम, समर्थ, युवा, नुमवी, स्वरूपवर्धिनी या पथकांचे वादन डिजेच्या भिंतींना देखील हाणून पाडतं. कलावंत हे पथक ही फार प्रसिध्द आहे. या पथकात श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, अनुजा साठे, अस्ताद काळे, सौरभ गोखले, तेजस बर्वे आदी कलाकार वादन करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पाठविणार पत्र

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

SCROLL FOR NEXT