Nawab Malik Saam Tv
ब्लॉग

Nawab Malik: 'या' माहितीच्या आधारावर नवाब मलिकांची ईडीकडून कसून चौकशी सुरू

दाऊदच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी सुरू असल्याचे समोर आले

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीच्या कोठडीमध्ये असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने (Ibrahim Kaskar) नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची शक्यता वर्तवली आहे. (On basis this information thorough investigation Nawab Malik was started ED)

यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आहे. नवाब मलिक यांची चौकशी ज्याकरिता ईडीने (ED) सुरु केली आहे. ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने याअगोदर ताब्यात घेतले आहे. या चौकशीमध्ये (inquiry) त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली आहे.

हे देखील पहा-

नवाब मलिक यांच्या भावाला काल ईडीने समन्स पाठवले होते. यानंतर आज पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला (Kurla) या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ५.३० ते ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरी पोहचले होते. यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर सकाळी ७ ते ७:३० वाजेच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांबरोबर घरातून निघाले आहे. (On basis this information thorough investigation Nawab Malik was started ED)

काय आहे प्रकरण?

मुंबईत (Mumbai) आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसापासून छापेमारी टाकण्यास सुरवात केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबई मधील मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चाला उधाण येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

या प्रकरणाविषयी देवेंद्र फडवीसानी ऑक्टोबर महिन्यामध्ये १ पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शहा अली खान हा ९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोटमधील आरोपी आहे. त्याच्यावर ताडा अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. शहा अली खान यांच्याकडून जमीन विकत घेण्यात आली होती, असा आरोप देवेंद्र फडवीसानी केला होता.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळ असलेले लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर दुसरीकडे २०१७ मध्ये ठाणे एका जमिन व्यवहारातून दाऊदकडून खंडणीसाठी फोन गेले होते. यात ठाणेच्या खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करत, इक्बाल कासकरला अटक केली होती.

तर नुकताच एनआयएने दाऊद टोळीकडून घातपाताची कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली होती.यात दिल्ली आणि महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना लक्ष केले जाणार होते. या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली होती.

दाऊद आणि टोळीने खंडणी, शस्त्र तस्करी, ड्रग्ज तस्करी, यातून जमा केलेल्या पैशाचा वापर जमिन खरेदी विक्रीत झाल्याचा संशय असल्याने मनी लाॅड्रीगचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. याच प्रकरणात १६ फेब्रुवारी रोजी इक्बाल कासकरला ईडीने अटक केली. न्यायालयाने त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यात इक्बालने एका जमिन व्यवहारात नवाब मलिक याचं नाव घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT