MaViAa And Imtiaz Jalil Saam Tv
ब्लॉग

महाविकास आघाडी करणार MIMचा स्वीकार?

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jalil) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) बैठक झाली असल्याचे समोर आले आहे.

Sanika

औरंगाबाद: राज्यात मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात रुसवे फुगवे झाले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करत महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ऐतिहासिक राजकीय घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. भाजपाविरोधी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन राज्यात सत्ता मिळवली. तर कालच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी मविआचे 25 आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यातच दुसरीकडे ओवैसी यांच्या MIM ने आता महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jalil) आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) बैठक झाली असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यंत आपला निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे.

त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जलील यांनी दिलेल्या ऑफरवर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एमआयएमने काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करण्याची ऑफर दिली आहे. भाजपाला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज्यात २०१९च्या निवडणुकीत मुखमंत्री पदावरून शिवसेनेला आणि भाजपमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर भाजपशी आपली युती तोडत काँग्रेस –राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला सत्तेत येता आले नाही. मात्र हिंदुत्ववादी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरत शिवसेनेवर प्रहार करणे सुरू केले. त्यात आता महाविकास आघाडी जर MIM सोबत गेली तर भाजपाला आयते कोलीत सापडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT