नागपूर: राज्यात सध्या एका वेगळ्याच आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. MIM ने राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरुन आता विविध टीका भाजप नेते करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. MIM ने जरूर राष्ट्रवादीसोबत जावं, कारण शेवटी ते एकंच आहे.
भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व एकत्र आले तरिही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता मोदीजींच्या (Narendra Modi) मागे आणि ती भाजपला निवडून देईल. MIM राष्ट्रवादीसोबत आल्यावर शिवसेना काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पाच राज्यातील पराभवावरुन ही फडणवीसांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ते हारले की त्यांना इव्हीएम दिसते, बी टीम दिसते. हारल्यानंतर ते असं बोलत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही पाहतोय, सत्ते करता शिवसेना काय करते ते? तसंही हिंदूहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे केलंय, आणि अजानची स्पर्धा वैगेरे चाललीय. त्याचा परिणाम आहे का काय ते बघू असे म्हणत त्यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
संविधानीक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना, त्यांनी पदावर राहणे योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले. राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा रंगली होती. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टींबाबात माझी काही चर्चा झाली नाही. मुळात राजू शेट्टी आमच्यासोबत होते.
काही कारणाने ते पलिकडे गेले. सोबत येणार की नाही? प्रत्यक्ष कळल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. एकंच अपेक्षा आहे. मागच्या काळात जेवढे शेतकरी हिताचे निर्णय मोदींनी घेतले, तेवढे कुणीच घेतले नाही. साखर कारखानदारी, ऊस उत्पादकांसाठी मोदींनी अनेक निर्णय झाले. पण अद्याप राजू शेटी आणि माझी चर्चा झाली नाही असेही फडणवीस म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.