SAAM TV BREAKING NEWS LIVE UPDATES IN MARATHI (29 July) SAAM TV
ब्लॉग

Maharashtra Live Updates (29 Jul): पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकल वाहतूक उशिराने

Maharashtra Rain Live News Headlines in Marathi (29 Jul) : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. ठाण्यासह ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; लोकल वाहतूक उशिराने

पश्चिम रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट सुरू झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पश्चिम मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट; मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरडी काढण्याच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. तब्बल ३ तासानंतर आता पुणे मुंबई एक्सप्रेस वे सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झाली आहे.

Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉकची वेळ वाढवली

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉकची वेळ वाढवली. काम पूर्ण करण्यास आणखी किती वेळ लागणार याबाबत यंत्रणेकडून काहीही माहिती मिळू शकली नाही.

अकोला : तेल्हारा तालुक्यातील वाण धरणाचे 2 दरवाजे उघडले, नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा

अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील वाण धरण 71.42 टक्के भरल्याने वाण धरणाचे 2 दरवाजे आज दुपारी 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. यामधून 52.08 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच वाण नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर गेल्या 2 दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगा आणि वाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने प्रकल्पाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उद्या ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषकांचा मेळावा

ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचा उत्तर भारतीय आणि हिंदी भाषक मेळावा

ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे मेळाव्याचे आयोजन

संध्याकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

मागच्या आठवड्यात हा मेळावा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे रद्द करण्यात आला होता.

वर्धा नदीने धोक्याची ओलांडली पातळी , ७ गावांचा संपर्क तुटला

यवतमाळ जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. निम्न वर्धा प्रकल्पातून 19 दरवाजांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वर्धा नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे. सद्यस्थितीत वणी तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील भुरकी, चिंचोली, सावंगी, शेलू (खु), शिवनी जहागीर, जुगाद, साखरा या गावांचा संपर्क तुटला आहे.

चंद्रपुरात इरई नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती, आपत्ती व्यवस्थापनाचे बचावकार्य सुरू

चंद्रपूर शहरालगतचे इरई धरण सुमारे 87 टक्के भरले असून धरणाची 7 पैकी 2 दारे उघडली आहेत. 2 आणि 6 क्रमांकाची दारे 0.25 मीटरने उघडली आहेत. इरई नदी चंद्रपूर शहराला वळसा घालते. त्यामुळे  खालच्या भागात पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या नदीकाठच्या राजनगर, सहारा पार्क परिसरात उंच इमारतींवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीद्वारे बचाव मोहीम हाती घेतली.

प्रशासनाने नदी काठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. इरई नदी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते; मात्र वर्धा नदीलाच महापूर असल्याने इरईचे पाणी उलट दिशेने वाहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहराच्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर होणार असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात हलक्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 54 टक्के एवढा पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यासह 5 तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

कोरेगाव - भीमा प्रकरणी वर्नन गोन्सालविस आणि अरूण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी वर्नन गोन्सालविस आणि अरूण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप या दोघांवर आहे.

आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. मतदारसंघातील कामांसंदर्भात या भेटीत चर्चा झाली.

एमआयडीसीचा विषय रोहित पवार यांनी लावून धरला होता, त्यानंतर दोघांची भेट ही महत्वाची मानली जाते.

नाशिक: गंगापूर धरणातून गोदावरीत पाणी सोडलं

गंगापूर धरणातून दुपारी १ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. सुरुवातीला ५३९ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ६९ टक्के भरलंय. धरणात अद्याप समाधानकारक पाणीसाठा नसला तरी जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार ३१ ऑगस्टपर्यंत धरणात ७० टक्क्यांपेक्षा पाणी साठवता येणार नसल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. तर दारणा धरणातूनही १०००० क्यूसेक पाणी दारणा नदीपात्रात सोडण्यात आलंय. हे पाणी पुढे जायकवाडी धरणात पोहचणार असल्यानं मराठवाड्याला देखील दिलासा मिळणार आहे.

अनेक जमिनींचे व्यवहार नोटरीद्वारे, नियमितीकरणाचे नीलम गोऱ्हेंचे विधान परिषदेत आदेश

अनेक जमिनींचे व्यवहार हे नोटरीद्वारे केले जातात

उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निरीक्षण

नोटरीचे नियमितीकरण करण्याचे आदेश

महसूल विभाग विधी व न्याय विभागासोबत चर्चा करून नियम करणार

नोटरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी ठरवणार

दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी विविध विकासकामे आदींची माहिती दिली. शिंदेंनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. आम्ही रस्त्यावर उतरून कामे करतो, वर्क फ्रॉम होम नाही, असे शिंदे म्हणाले.

वाडा, पालघर, वसईतील गावांना सतर्कतेचा इशारा, मोडकसागर धरणातून पाण्याचा विसर्ग

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर धरण काल रात्री १०. ५२ वाजता भरले आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. धरणातून ६००० क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील वाडा, पालघर, वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैतरणा धरण ८१ टक्के भरले असून, लवकरच हे धरण देखील ओव्हर फ्लो होईल.

जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस; नदी- नाल्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली

पालघर तालुक्यात काल दुपारपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात धुवाधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. गावपाड्यांत जाणाऱ्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. अनेक रस्ते, साकव पाण्याखाली गेले आहेत. जव्हार तालुक्यातील खरोंडा गावचे पूल वाहून गेल्याने तिथला संपर्क तुटला.

मुंबईतील शाळांना सुट्टी नाहीच; 'ते' पत्र बनावट, महापालिकेचं स्पष्टीकरण

मुंबईसह राज्यातील शाळांना पावसामुळे आज देखील सुट्टी दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालये आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी नियमित सुरू राहणार आहेत. महानगरपालिकेने आज शाळा, महाविद्यालये यांना कोणतीही सुटी जाहीर केलेली नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Rain Live Updates: पाणी पाहण्यासाठी गेला अन् थेट नदीत पडला; वारणा नदीत अडकलेल्या तरुणाला बचावपथकाने वाचवलं

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोल्हापुरातील वारणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी एक व्यक्ती गेला होता. मात्र, पुराचं पाणी पाहत असताना त्याने संतुलन गमावलं आणि तो थेट नदीत पडला. सुदैवाने या तरुणाला झाडाचा आश्रय मिळाला. तो झाडावर अडकून पडला होता. दरम्यान, बचावपथकाने त्याला वाचवलं आहे.

तेलंगणामध्ये पावसाचं रौद्र रुप; ८ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये २२ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तेलंगणामध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि कॉलेजला सुट्टी जारी करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये गुरुवारी झालेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस असल्याची नोंद झाली आहे.

नांदेडमध्ये पावसाचं थैमान, आसना नदीला महापूर; हिंगोली-परभणीकडे जाणारी वाहतूक बंद

हिंगोलीसह नांदेडमध्ये झालेल्या पावसानंतर मध्यरात्री पासून आसना नदीला महापूर आलाय, आसना नदीने आपले पात्र सोडत शेकडो हेक्टर जमिनीवरची पिके पाण्याखाली गेली आहेत. पासदगांव इथल्या आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेडहून हिंगोली-परभणीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान हवामान खात्याने आजही पावसाचा इशारा दिल्यानंतर आज नांदेडमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आसनाच्या या महापुरामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरची पिके पाण्याखाली गेली आहेत

पालघरमध्ये मुसळधार पाऊस, सूर्या नदीला महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यात आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सूर्या नदीला महापूर आल्याने रस्ते, पुल, साकव, पाण्याखाली गेल्याने अनेक गाव पाड्यांचाचा एकमेकांचा संपर्क तुटला आहे. डहाणू तालुक्यातील उर्से -सरणी रस्ता वरील साकवांवर (पुलावर) पाणी आल्यामुळे अजूनही बंद असून दहा गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे.

धामणी धरणाची पातळी अतिवृष्टीमुळे वाढली असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धामणी चे पाच दरवाजे 2 मीटर ने उघडले .त्यामुळे धामणी मधून 25 हजार 555 क्यूसेक तर त्याच्या खाली असलेलं कवडास धरण ही ओव्हरफ्लो..कवडास धरणातून 68501 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे.

त्यामुळे दोन्ही धरणाच्या विसर्गाने सूर्या नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावाना सर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिला आहे.आज धामणी धरण क्षेत्रात 324 मिमी पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत सरासरी 2907 मिमी पावसाची नोंद धरण क्षेत्रात करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नद्या-नाल्यांना पूर, अनेकांच्या घरात शिरलं पाणी

अमरावती जिल्ह्यत गुरूवार पासून संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्ह्यतील अनेक नद्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी नगरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जननिवन विस्कळीत झाले.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे गावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. गावातील मुख्य रस्त्यांवरून कंबरेऐवढे पाणी वाहत असल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.

तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेरूळ रोंघे येथे सुद्धा पावसाने थैमान घातले असून अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोबतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकांची सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात; तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक मंदावली

मुंबईत शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबलं असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, या पावसाचा फटका मुंबई लोकलला देखील बसला आहे.

शुक्रवारी सकाळपासून मुंबई लोकलची वाहतूक उशीराने सुरू होती. पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने तर मध्य रेल्वेची वाहतूक १२ ते १५ मिनिटाने धावत आहे. याशिवाय हार्बर लाईन्सची वाहतूक सुद्धा १५ ते २० मिनिटे उशीराने सुरू आहे.

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची सुरूवात झाल्याने कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यातच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुण्यातील रास्ता पेठेत वडाचं झाड कोसळलं; दोघेजण जखमी

रास्ता पेठेतील पॉवर हाऊससमोरील जुने वडाचे झाड कोसळून दोघेजण जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत तीन दुचाकी, टेम्पो आणि हातगाडीचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक रेस्क्यू व्हॅन आणि दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना केईएम रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. झाड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान आणि उद्यान विभागाच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरून झाड दूर करण्याचे काम सुरू होते.

Maharashtra Rain Live Updates: राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने गुरूवारी मुसळधार पावसाने अक्षरश: धुवून काढलं. शुक्रवारी हवामान खात्याने राज्यातील ७ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मुंबई, ठाण्यात पावसाची दिवसभर जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

दरम्यान, आजही हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. ठाण्यासह ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

SCROLL FOR NEXT