Maharashtra Breaking Updates 26th December 2023 Live in Marathi SAAM TV
ब्लॉग

Breaking News Live Updates: मोठी बातमी! मुंबईतील भाऊचा धक्क्यावर एकामागोमाग 6 जण बेशुद्ध पडले, दोघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Updates Live in Marathi: आज मंगळवार २६ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...

Satish Daud

मोठी बातमी! मुंबईतील भाऊचा धक्क्यावर एकामागोमाग 6 जण बेशुद्ध पडले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील भाऊचा धक्क्यावर दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जण अचानक बेशुद्ध पडले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. इतर ४ जणांवर जे जे रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईतील दिघा एमआयडीसीमध्ये मोठी आग; ४ मजले जळून खाक

नवी मुंबईतील दिघा एमआयडीसीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र फ्लोअर मिल कंपनीला ही आग लागली आहे. कंपनीत अनेक वर्षांपासून बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. आगीत चार मजली कंपनी पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

कल्याणमध्ये शॉर्टसर्किटमुळे घराला आग, घरातील साहित्याचे मोठे नुकसान

कल्याण पश्चिमेकडील चिकन घर परिसरातील जय मातोश्री इमारतीच्या तळमजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे फ्रिजने पेट घेतला. क्षणार्धात ही आग किचनमध्ये पसरली.

सुदैवाने घरात कुणी नव्हतं. घराला टाळे होते. मात्र खिडकीतून धूर येऊ लागल्याने रहिवाशांना संशय आला.

रहिवाशांनी अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली

अजित पवार गटाने अपात्रतेबाबतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी मागितला अधिकचा वेळ

विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणीप्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात अजित पवार गटाने अपात्रतेबाबतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा अधिकचा वेळ मागितला आहे. 5 डिसेंबरला आमदारांना विधीमंडळाकडून 8 दिवसांत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या. यावर आता अजित पवार गटाने उत्तरासाठी 1 महिना अधिकचा कालावधी मागितला आहे.

तर दुसरीकडे शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर सादर केले आहे. शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरूण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रतेबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तर अजित पवार गटात अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली होती.

नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची सांगता, १०५ व्या दिवशी संपल उपोषण

सकल मराठा समाजाकडून नाशिकच्या शिवतीर्थावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाची आज १०५ व्या दिवशी सांगता करण्यात आली. २० जानेवारीला मुंबईला जाण्यासाठीच नियोजन देखील नाशिकच्या सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. यासाठी नाशिकच्या गावागावात मराठा समाजाकडून गाव सभा घेण्यात येणार आहे. मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी येत्या ३० डिसेंबरला सकल मराठा समाजाची बैठक होणार असून नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी गाड्या, शिधा, पायी जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी रस्त्यात व्यवस्था करण्यासंदर्भात नियोजन केलं जाणार आहे.

मनोज जरांगेंची सभा घेणाऱ्या ११ आयोजकांवर गुन्हा, पोलिसांची कारवाई

लातूरचा रेनापुर येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची नुकतीच 22 डिसेंबर रोजी सभा पार पडली. दरम्यान सभा रात्री उशिरा घेतल्यामुळे 11 आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. पोलिसांनी हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल केला असून यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांच्या उशिरापर्यंत सभा झाल्यात. मात्र, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप आता मराठा समाजाकडून केला जातोय. तर उद्या रेनापुर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात येत आहे.

ईव्हीएममशीन जनजागृती अभियानाला सुरूवात;  मोहीमेला तहसील कार्यालयात हिरवा झेंडा

देशातील जवळपास सर्वच निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे घेतल्या जात असून, ईव्हीएम मशीन संदर्भातील मतदारांच्या मनातील असलेले संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

शिरपूर विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या व तहसील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये ईव्हीएम जनजागृती मोहीमेला तहसील कार्यालयात हिरवा झेंडा दाखवत या मोहिमेला सुरू झाली आहे, 2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून गणले जाणार असून, यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका संपूर्ण देशात पार पडनार आहेत, आणि या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरु आहे, निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यातंर्गत तालुक्यात जनजागृती मोहिम सुरु झाली असून ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने तहसील कार्यालयात प्रात्याक्षिक करुन दाखविले आहेत.

सांगलीत दत्त जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटेपासून मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात दाखल झालेत. दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा देखील साजरा होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त कृष्णा नदीत मोठया संख्येने भाविक स्नानासाठी दाखल झाले आहेत. दत्त जयंती निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने मंदीरातील सर्व यंत्रणा देखील सज्ज आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ. भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानाला तब्बल तीन-साडेतीन तासाचा झाला उशीर. मुंबईहून भुवनेश्वरला जाणारे विमान 6E2301 या विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे होऊ शकले नाही. तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ प्रवाशांना कोणतीही सूचना मिळत नसल्यामुळे प्रवशानी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

लातूरच्या खासगी कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचं मोठं कोम्बिंग ऑपरेशन

लातूरच्या खासगी कोचिंग क्लासेस परिसरात रस्त्यावर गोंधळ करत फिरणारे, नशा करणारे , तसेच अमली पदार्थ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर लातूर पोलिसांनी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं. यामध्ये 123 जणांविरुद्ध पोलिसांनी कार्यवाही केली आहे.

शिर्डीत दत्त जयंतीचा उत्साह; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

आज राज्यभरात दत्तजयंती उत्साहात साजरी ‌होत आहे. शिर्डी साई मंदिरातही श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. दत्त जयंतीच्या पार्श्वभुमीवर साई मंदिर, दत्त मंदिर, द्वारकामाई, गुरूस्थान तसेच चावडी मंदिरासह परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मंगळवारी सायंकाळी दत्त जन्माचा सोहळा पार पडणार आहे. नाताळच्या सुट्टयांमुळे भाविकांच्या‌ गर्दीचा ओघ सातत्याने सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत साईदर्शनाने व्हावे यासाठी भाविकांची पावले शिर्डीत दाखल होत आहेत.

मला पक्षाने सांगितले तर मी निवडणूक लढेल - दानवे

मला पक्षाने सांगितले तर मी निवडणूक लढेन, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.

महायुतीचा जागावाटपाचा तिढा वाढणार, अजित पवार गटाची स्पष्ट भूमिका, सूत्रांची माहिती

लोकसभेला जितक्या जागा शिंदे गटाला, तितक्याच जागा अजित पवार गटाला हव्यात

महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अजित पवार गटाची भूमिका

सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार, तर शिंदे गटाचे 13 खासदार

जागावाटपामध्ये समसमान जागावाटप करण्यात यावं, अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याची राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांची माहिती

आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक

अजित पवारांसोबत झालेली चर्चा खासगी, ती जाहीर करायची नसते - अमोल कोल्हे

मी राजीनामा देण्याबाबात अजित पवार यांच्याशी झालेली चर्चा खासगी स्वरुपाची होती. खासगी चर्चा जाहीर करायची नसते. पण, त्यामागचे संदर्भ आणि परिस्थिती वेगळी होती. ती देखील बाहेर यायला हवी, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर

अजित पवार करणार पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची पाहणी

सावित्रीबाई फुले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन देखील अजित पवार यांच्या हस्ते होणार

सकाळी ११ वाजता अजित पवार लावणार ५०वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२३ उद्घाटन समारंभाला उपस्थिती

अजितदादा मोठे नेते, त्यांच्याविषयी आदर कायम : अमोल कोल्हे

आदरणीय अजितदादा मोठे नेते आहेत. त्यांना कान धरण्याचा अधिकार होता. त्यांनी त्यावेळी कान धरला असता तर सोपे झाले असते. अजित पवारांविषयी आदर कायम आहे. अजितदादांचं आव्हान म्हणजे माझ्यासाठी गौरव आहे, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबईत शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल गुन्हा दाखल

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट. विशाल गोरडे या व्यक्तीविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने आक्रमक होत काळं फासण्याचा दिला इशारा.

संगमनेरमध्ये एसटी महामंडळाची बस उलटली; शाळकरी विद्यार्थी जखमी

संगमनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्सेल तुटल्याने राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली. तालुक्यातील पिंपरणे गावाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मानाच्या बैलाला सिमेंट मिक्सरने चिरडले, वारकरी संप्रदायात हळहळ

मुळशी तालुक्यात मानाच्या बैलाला सिमेंट मिक्सरने चिरडले, या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झालाय. भूकुम गावात सायंकाळी हा अपघात झाला आहे. मोती नावाच्या बैलाला संत तुकाराम महाराजांच्या आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मान मिळाला होता. भविष्यात पुन्हा एकदा हा मान मिळवण्यासाठी मोतीकडून सराव करून घेतला जातो.

मंगळवारी पहाटे सराव सुरू असताना चांदणी चौकाकडून पौडच्या दिशेने सिमेंट मिक्सर निघाले होते. मात्र त्याचवेळी चालकाचा ताबा सुटला अन पुढे निघालेल्या बैलगाडीला त्याने जोराची धडक दिली. या अपघातात मोतीचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळं भुकुम गावासह वारकरी संप्रदाय आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये..

खासदार अमोल कोल्हे आज शरद पवारांची भेट घेणार

शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहे. पुण्यातील मोदी बागेतील पवार यांच्या निवासस्थानी सकाळी ९ वाजता ही भेट होणार आहे. अजित पवार यांनी कोल्हे यांना पराभूत करण्याचं दिलेलं आव्हान आणि उद्या जुन्नर येथुन सुरु होणारी महाविकास आघाडीची संघर्ष यात्रेवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT